शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

प्रजासत्ताक दिन चिरायु होवो

By admin | Published: January 28, 2017 12:21 AM

शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये ६८वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले.

पिंपरी : शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये ६८वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. तसेच, विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नेहरूनगर येथील महापालिकेच्या राजीव गांधी माध्यमिक विद्यालय, पंडित जवाहर लाल नेहरु मुले क्रंमाक १-२ ,उर्दू शाळा ,कन्या शाळा क्रमांक १-२ यांच्या संयुक्तरित्या ६८ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.राजीव गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी कन्या शाळा क्र १ मुख्याध्यापिका सरला गिरी, कन्या शाळा क्र. २च्या मुख्याध्यापिका अनिता काटे, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका अरीफा शेख, पंडित जवाहर लाल नेहरु मुले क्र १ चे मुख्याध्यापिका रोहिणी शेंडगे, मुले क्र २ चे प्रभारी मुख्याध्यापक दिलीप जाधव शिक्षक एच बी दळवी आदी शिक्षक विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी भाषणातून देशाविषयी माहिती सांगितली. ज्योती इंग्लिश स्कूलज्योती इंग्लिश हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शिक्षिका राधा जयकुमार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हूणुन संस्थेचे अध्यक्षा व पुणे बार असोसिएशनच्या माजी सचिव अ‍ॅड. रूपाली वाघेरे, सचिव बापू वाघेरे, मुख्याध्यापिका अनघा कुलथे उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी समूहगीत, संचलन, लेझीम नृत्य देशभक्तीपर नृत्य, विविध नाटके, देशभक्तीपर गीते सादर केली. हर्षदा देशमुख, श्रुती राजपूत या विद्यार्थांनी आपल्या भाषणातून भारत देशाविषयी माहिती सांगितली. वसंतदादा पाटील विद्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिक शांताराम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना विद्यालयामध्ये निर्माता-दिग्दर्शक सतीश फुगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी प्राचार्य विजया चव्हाण, उपप्राचार्य डॉ राजेंद्र कोकणे, मुख्याध्यापक संजय जाधव उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते राष्ट्रीय पातळीवर किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या पूजा हजेरी, सुवर्णपदक मिळवणाऱ्या परवेज शेख, तसेच लंगोरी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या प्रतिक पगडे या खेळाडूंना सत्कार करुन गौरवण्यात आले. संत तुकाराम नगर पोलिस चौकीमध्ये सहायक पोलिस निरीक्षक गजानन कडाळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, उपनिरीक्षक तुळवे, पोलिस कर्मचारी राजेंद्र मारणे, किशोर वाव्हळ, नवनाथ खेडेकर, वाघवले, संदीप मांडवी, दत्ता घाडगे दिलीप ताजने आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.शुभंकर प्ले ग्रुपतळवडे : येथील शुभंकर प्ले ग्रुप व नसर्रीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी बालचमूंनी नृत्य, नाटक व भक्तीगीते सादर केली. पिंपरी-चिंचवड शहर स्पोर्टस डान्स असोसिएशनचे प्रमुख राहुल शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्या प्रियंका बाठे, शिक्षिका अलका क्रमपतवार व साधना रोकडे आदी उपस्थित होते. पिंपळे गुरवमध्ये साहित्यवाटपपिंपळे गुरव : येथे मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने अरुण पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी गरीब गरजु विद्यार्थ्यांसाठी बाल शिक्षण संस्कार केंद्र सुरु करण्यात आले. यावेळी ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण खडसे यांनी मुलांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. यावेळी दत्त आश्रमाचे विश्वस्त शिवानंद स्वामी, राजु लोखंडे, संजय जगताप, वामन भरगांडे, वसंतराव जगदाळे, रामदास दहिवाल,शरद देसले, मारुती बानेवार आदी उपस्थित होते. दत्तात्रय धोंगडे यांनी सुत्रसंचलन केले. सुर्यकांत कुरुलकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)