पिंपरी : शहरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून निगडी ओटास्कीम या भागातील रहिवाशी असलेल्या कोरोनाबधित ६२ वर्षांच्या पुरुषाचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुरुषावर पिपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. बारा दिवसांत शहरात कोरोनाने चौथा बळी घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे. दिनांक 9 एप्रिलला एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी निगडीतील महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर बुधवारी वाय सी एम मध्ये उपचार घेत असलेल्या पुण्यातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर आज सकाळी एका व्यक्तीच्या मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे चौघांचा मृत्यु झाला आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात निगडित येथील एका अॅडमिट केले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. तर आज 12 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात पाच महिला आणि सात पुरुषाचा समावेश आहे. हे रुग्ण रुपीनगर परिसरातील आहेत."
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा चौथा बळी; निगडीतील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 12:50 PM
पिंपरी-चिंचवड शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित
ठळक मुद्देआज 12 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात पाच महिला आणि सात पुरुषाचा समावेश