शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

हेल्मेट नसल्याने डाेक्याला मार लागून दुचाकीचालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 4:06 PM

हेल्मेट परिधान न केल्याने दुचाकीचालकाचा दुभाजकला धडकून दुचाकीचालकाचा मृत्यू झाला.

पिंपरी : पुलावरील रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक आणि एक जण गंभीर जखमी झाला. ३ जून रोजी पहाटे हा अपघात झाला होता. उपचारा दरम्यान ६ जून रोजी मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला. हेल्मेट परिधान केले नसल्याने डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्विजय किरण मेदनकर (वय २३, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. तेजस विकास गोपाळे (वय २९, रा. स्पाईन रोड, मोशी) असे जखीम झालेल्याचे नाव आहे. दिग्विजय मेदनकर आणि त्याचा मित्र तेजस गोपाळे हे दोघेही दि. ३ जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास भूक लागली म्हणून भोसरी येथे खाण्यासाठी जाण्यास निघाले. मेदनकर याने त्याच्याकडील मोटारसायकलवरून (क्र. एमएच १४ ईटी ८०७०) जायचे असू सांगून मित्र गोपाळे याला मोटारसायकलवर पाठीमागे बसविले. दोघेही मोटारसायकलवरून भोसरीकडे जात होते. त्यावेळी भोसरी पुलावर रस्त्याच्या दुभाजकाला मेंदनकर याने मोटारसायकलची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला गोपाळे याला डोक्याला, उजव्या हाताच्या मजगटाजवळ दुखापत होऊन त्याच्या पोटालाही भाजले. तसेच मोटारसायकल चालविणाऱ्या मेदनकर याच्याही डोक्याला मार लागला. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेदनकर याचा उपचारादरम्यान ६ जून रोजी मृत्यू झाला.  

दरम्यान, गोपाळे यांच्यावर उपचार सुरू असल्याने जबाब नोंदणी करून गुन्हा दाखल करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे शुक्रवारी (दि. १४) गोपाळे याचा जबाब नोंदवून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश मुंढे यांनी फिर्याद दिली आहे. मोटारसायकल चालक दिग्विजय मेदनकर याने हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याने दुभाजकाला  मोटारसायकलची धडक दिल्याने अपघात झाला असल्याचे गोपाळे याने जबाबात नमूद केले असल्याचे भोसरीचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यू