किवळे : देहूरोड बाजारपेठेत किराणा मालाचे दुकान चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालविणा-या विधवा महिलेस शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून मारहाण करीत बेकायदा जमाव जमविल्याने नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अटक केलेल्या तीन आरोपींना दि. ११ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले.सरला रमेश आगरवाल (वय ४२, रा. घर नं. २६, मेन बाजार, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. सूरज दिगंबर कारंडे (रा. कैलाशनगर, लोणावळा), अतुल नागेश राऊत (रा. राऊतवाडी, ता, मावळ), अस्लम अकबर मुलानी (रा. कामशेत इंद्रायणीनगर), माला आगरवाल, सोनाली आगरवाल, मोनाली आगरवाल, आंचल आगरवाल, अंकिता आगरवाल, कांचन आगरवाल (सर्व रा. देहूरोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.सरला रमेश आगरवाल आणि माया अगरवाल या विधवांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ, तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी व्यापाºयांनी बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला. मूक मोर्चा काढून निषेध सभा घेतली. बोर्ड उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, यदुनाथ डाखोरे, राष्ट्रवादीचे कृष्णा दाभोळे, भाजपाचे लहू शेलार, अजय लांगे आदींनी निषेध नोंदविला.
विधवा महिलेस शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून मारहाण , तीन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 2:30 AM