पिंपरी : अनधिकृत बांधकामांना असणारा शास्तीकर माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, अध्यादेश अद्याप आलेला नाही. सहाशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा शास्तीकर माफ होणार असून, शहरवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. शास्ती माफी फसवी आहे. भाजपाने वर्षभरात शहरात एकही विकासाचे काम केले नसून, राष्ट्रवादीच्या कामावरच भाजपाचे नेते उड्या मारत आहेत, अशी टीका माजी आमदार विलास लांडे यांनी केली.अनधिकृत बांधकामावरील शास्ती, चिंचवडला बांधकाम बंदी वभोसरीतील गुंडगिरी यावर राष्टÑवादी काँग्रेसने भूमिका मांडली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, सरचिटणीस फजल शेख, माजी नगरसेवक नीलेश पांढारकर, लाला चिंचवडे आदी उपस्थित होते.विलास लांडे म्हणाले, ‘‘आजपर्यंत शहराचा नियोजनपूर्वक विकास झाला. आता शहराचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालला आहे. कायदा-सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. टपरी राज, गुंडगिरी वाढली आहे. महिला, मुली असुरक्षित आहेत. सध्या पोलीस आयुक्तालयाचे श्रेय भारतीय जनता पक्ष घेत आहे. मात्र, पोलीस आयुक्तालयाचा प्रस्तावदेखील राष्ट्रवादीच्या काळातील आहे. त्यास मंजुरी आता दिली गेली. ’’आयुक्त नाहीत सक्षममहापालिका आयुक्त सक्षम नाहीत. त्यामुळे शहराची दुरवस्था झाली आहे. सक्षम आणि कडक स्वभावाचे अधिकारी अशी ओळख असलेले डॉ. श्रीकर परदेशी व तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाºयांची शहराला गरज आहे. हे अधिकारी आले तर शहराची सुधारण होईल, अशी टीका लांडे यांनी केली.
सत्ताधाऱ्यांचा शास्ती माफीचा निर्णय फसवा - विलास लांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 2:07 AM