शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

दादागिरी खपवून घेणार नाही,‘स्थायी’चा अधिका-यांना इशारा, शासनाच्या सेवेत परत पाठविण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:33 AM

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी काम करणा-या विशेष कार्य अधिका-याने दमबाजी व दादागिरी केल्याचा विषय आजच्या स्थायी समितीसमोर गाजला. बेशिस्त खपवून घेणार नसल्याचे स्थायी समितीने सांगितले.

पिंपरी : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी काम करणा-या विशेष कार्य अधिका-याने दमबाजी व दादागिरी केल्याचा विषय आजच्या स्थायी समितीसमोर गाजला. बेशिस्त खपवून घेणार नसल्याचे स्थायी समितीने सांगितले. ‘ज्या अधिका-यामुळे आपल्याला मान्यता मिळण्यास उशीर झाला. त्यांची महापालिकेला आवश्यकता नाही. त्यांच्यामुळे वायसीएममधील वातावरण दूषित होत असेल, तर अशा अधिका-याला शासनसेवेत परत पाठवा, या विषयीचा प्रस्ताव पुढील सभेत समितीसमोर ठेवण्यात यावा, अशा सूचना स्थायी समितीने प्रशासनास दिल्या.कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विशेष कार्य अधिकाºयाने ‘माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे, मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईन. माझ्या नादाला लागाल, तर मी सगळ्यांची वाट लावीन, अशी धमकी दिली असल्याचे पत्र वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी पालिका आयुक्तांना दिले होते. तसेच विशेष कार्य अधिकाºयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली असून, त्यांची पालिकेतील सेवासमाप्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर वायसीएममधील कर्मचाºयांनी या प्रकाराचा निषेध केला होता.या प्रकरणाचे पडसाद स्थायी समितीच्या सभेत उमटले. स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी अधिकाºयांच्या दमबाजीविषयी नाराजी व्यक्त केली.आशा शेंडगे म्हणाल्या, ‘‘उपद्रवी माणसांची आपल्या महापालिकेस गरज नाही. अधिकाºयांना दमबाजी करणे योग्य नाही.’’ शरद मिसाळ म्हणाले, ‘‘बघून घेईन, पाहून घेईन, असे म्हणणे योग्य नाही. स्थायी समितीने ही बाब गांभीर्याने घ्यावी.’’- प्रशासनाकडून डॉ. पंडित यांची माहिती मागवून घेतली. त्यानंतर सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि डॉ. अनिल रॉय यांनी पंडित हे मानधन तत्त्वावर आहेत. त्यांची मुदत संपली आहे, असे सांगितले आहे. पंडित यांची आवश्यकता नसल्याचेही प्रशासनाने या वेळी सांगितले. याविषयी पुढील सभेत कारवाईचा प्रस्ताव ठेवावा, अशी मागणी सदस्यांनी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड