शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महापौरांविरोधात घोषणाबाजी

By admin | Published: April 12, 2017 4:10 AM

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे अनुपस्थित राहिल्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने निषेधाच्या

पिंपरी : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे अनुपस्थित राहिल्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. ‘रायगडावर महाराष्ट्रातील महापौर, उपमहापौरांचा कार्यक्रम असल्याने महापौर उपस्थित राहू शकले नाहीत, अन्य पदाधिकारी उपस्थित होते, असे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमास ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रताप गुरव यांच्या हस्ते पिंपरीतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या कार्यक्रमास महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे अनुपस्थित राहिल्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मनपाच्या वतीने पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पुष्पहार अर्पण केला. परंतु महापौर व उपमहापौरांनी महात्मा फुले जयंतीस अनुपस्थित राहून या महापुरुषांचा अवमान केला आहे. महापौर आणि उपमहापौरांनी या चुकीबाबत जाहीर माफी मागावी. पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली असली तरी महापौर व उपमहापौरांनी ओबीसी समाजाचा व फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांचा आदर राखावा अशी मागणी माळी महासंघाचे अध्यक्ष आनंदा कुदळे, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रताप गुरव यांनी केली आहे. यावेळी माजी महापौर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नगरसेवक संतोष लोंढे, नगरसेविका सुलक्षणा धर, माधवी राजापुरे, आशा शेंडगे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा व शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरीजा कुदळे, पी.के महाजन, प्रविण कुदळे, नेहुल कुदळे, ईश्वर कुदळे, हनुमंत माळी, महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष निवृत्ती गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)- याबाबत बोलताना पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘रायगडावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होता. त्यास राज्यातील सर्व महापालिकांचे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर उपस्थित राहणार होते. त्यामुळे आपले पदाधिकारी कार्यक्रमास गेले होते. मात्र, पक्षनेते आणि स्थायी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरीत महोत्सवाचे कार्यक्रम दिवसभर सुरू आहेत. त्यामुळे दिवसभरात होणाऱ्या कार्यक्रमास महापौर उपस्थित राहणार आहेत.’’