रहाटणी : प्रभाग क्रमांक २७ व २८ सर्वसाधारण पुरुष गटातून देविदास तांबे इच्छुक आहेत. त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला असून, दोन्ही प्रभागांतून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने या जागेसाठी तेच दावेदार असल्याचे मानले जात आहे. रहाटणी व पिंपळे सौदागर मिळून दोन प्रभागांची निर्मिती झाली असल्याने दोन्ही प्रभागात त्यांचा नागरिकांमध्ये चांगला प्रभाव असल्याने येथील मतदार त्यांनाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.देविदास तांबे हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. नागरिकांच्या अनेक समस्यांवर प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. म्हणून जनसामान्यांत त्यांची चांगली प्रतिमा आहे. वर्षानूवर्षे त्यांनी रहाटणी परिसरात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम करून समाज संघटन करण्यासाठी अनेक विधायक कामे केली आहेत. तरुणांच्या उन्नतीसाठी ते सातत्याने झटत असतात. म्हणून त्यांच्याकडे तरुणांची मोठी फळी कार्यरत आहे. महिलांच्या रोजगारासाठी वर्षभर अनेक रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. म्हणून महिलांचाही त्यांना मोठा पाठींबा आहे. त्यामुळेच देविदास तांबे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिलांपासून पुरूषांपर्यंत सर्वांनाच आपलेसे वाटतात. त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, अद्याप कोणत्याही पक्षाची उमेदवारी स्वीकारलेली नाही. मात्र जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या पक्षाची ते उमेदवारी घेण्यास इच्छुक आहेत. सध्या त्यांच्या संपर्कात अनेक पक्षांचे श्रेष्ठी असल्याने या जागेसाठी इच्छुक असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र दोन्हीपैकी ते कोणत्या प्रभागातून निवडणूक लढविणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरात सर्वच राजकीय पक्षांत त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. कारण देविदास तांबे हे सर्वसाधारण पुरुष गटातील त्या जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याने या दोन्ही प्रभागातील राजकीय गणित बदलू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरातील एक अभ्यासू तरुण म्हणून त्यांची ओळख तर आहेच त्याचबरोबर प्रशासनाचाही त्यांचा चांगला अभ्यास असल्याने त्यांच्याकडून सर्वसामान्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे तांबे यांच्यासारखे उमेदवार निवडून देण्यासाठी नागरिकही त्यांना प्रोत्साहन देत आहेत. तांबे यांनी दोन्ही प्रभागांतून उमेदवारी दाखल करावी असा आग्रह नागरिकांनी धरला आहे. मात्र तांबे कोणत्या प्रभागातून उमेदवारी दाखल करणार व कोणत्या पक्षांतून निवडणूक लढणार हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. अऊश्ळ.
देविदास तांबे यांची प्रचारात आघाडी
By admin | Published: January 30, 2017 2:49 AM