देहूगाव : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाढीव क्षेत्रातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेंतर्गत बोडकेवाडी येथील धरणातून पाणी उचलण्यात येणार असून, यासाठी बोडकेवाडी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या ताब्यातील शिल्लक जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.मात्र, केवळ देहूच्या पाणीपुरवठा योजनेसाठी येथील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत त्यांनी दिलेल्या जागेवर महापालिकेच्या पालिका व जीवन प्राधिकरण किंवा शासनाच्या एखाद्या अधिकाºयाच्या मदतीने हे जमिनीचे हस्तांतरण करण्याचे काम करीत आहे की काय, त्यांच्यात काही अर्थपूर्ण व्यवहार झाला आहे काय असा सवाल करीत असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच हेमा मोरे यांनी केली आहे.या योजनेसाठी जागा हस्तांतरित करण्यासंदर्भातील मागणी पत्राद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे केली आहे. ही मागणी त्यांनी १४ डिसेंबर २०१७ च्या आयुक्त यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ही मागणी केली असून, तसे पत्रही जीवन प्राधिकरण यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे देहूकरांचाच घसा पाण्याअभावी कोरडा असताना देहूकरांच्या पाण्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका डल्ला मारणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. यासाठी देहूकरांनी जागृत होऊन पाणी वाचविणे आवश्यक असल्याचे मत सरपंच उषा चव्हाण व माजी सरपंच हेमा मोरे यांनी व्यक्त केले.आंद्रा व भामा आसखेड धरणातील मुख्य जलवाहिनी मंगरूळ व करंजविहिरे ते नवलाख उंब्रे येथील नियोजित बीपीटीपर्यंत व एकत्रित गुरूत्व जलवाहिनी नवलाख उंब्रे ते बीपीटी चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी देहू येथील बोडकेवाडी बंधाºयातून पाणी उचलण्याचे नियोजन केले असून, त्याबाबतचा आराखडा तयार करून जागेची पाहणीदेखील केली आहे. या योजनेसाठी आंद्रा धरण पाणी पुरवठा योजनेंतर्गत देहू येथील बोडकेवाडी बंधाºयाजवळ जॅकवेल व पंपिग स्टेशन उभारणे आवश्यक आहे. जॅकवेल व पंपिग स्टेशन बांधण्यासाठी लागणारी आवश्यक जागा आराखड्यानुसार नदीजवळ जागा उपलब्ध असून ही जागा सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या ताब्यात आहे.>शेतकºयांमध्ये वादमात्र, या जागेच्या मालकी हक्क व जागेचा ताब्यावरून शेतकरी व जीवन प्राधिकरण यांच्यात वादात देहूची पाणीपुरवठा योजनाही काही दिवस रखडली होती. मात्र, या जागेवर सध्या जीवन प्राधिकरणाचा ताबा आहे. असे असताना ही पिंपरी-चिंचवड महापालिका येथील शेतकºयांना व ग्रामपंचायत यांना अंधारात ठेवून या जागेचे हस्तांतरण मागत आहे. हे हस्तांतरण झाले तर मूळ मालक असलेले शेतकरी यांच्या तोंडाला पाने पुसली.ही जागा महापालिकेला हस्तांतरण करण्याचा घाट शासकीय अधिकाºयांनी घातला आहे की काय असा सवाल येथील शेतकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी करीत आहेत. केवळ देहूच्या पाणीपुरवठा योजनेसाठी येथील शेतकºयांनी दिलेल्या जागेवर महापालिका व जीवन प्राधिकरण किंवा शासनाच्या एखाद्या अधिकाºयांच्या मदतीने हे जमिनीचे हस्तांतरण करण्याचे काम करीत आहे की काय, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी हेमा मोरे यांनी केली आहे.
देहूचे पाणी पिंपरी-चिंचवडला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:52 AM