शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

देहूगावात दुपारनंतर मतदारांच्या लांबच लांब रांगा

By admin | Published: February 22, 2017 2:50 AM

देहू- लोहगाव जिल्हा परिषद गट व देहू, लोहगाव- निरगुडी वडगाव शिंदे गणातील मतदान शांततेत पार पडले.

देहूगाव : देहू- लोहगाव जिल्हा परिषद गट व देहू, लोहगाव- निरगुडी वडगाव शिंदे गणातील मतदान शांततेत पार पडले. जिल्हा परिषद चार व पंचायत समितीसाठी असलेल्या पाच उमेदवारांचे नशीब ईव्हीएममध्यो बंद झाले. मतदारांनी कसा कौल दिला हे गुरुवारी (दि. २३) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. सकाळी साडेसातला मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. मात्र, सकाळी कोणत्याही मतदान केंद्रावर नियोजित वेळेत कोणत्याही पक्षाचा वा उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी हजर नसल्याने केंद्राध्यक्षांनी नियमानुसार कामाकाजाला सुरुवात करून मतदानासाठी मतदान यंत्रे तयार केली. हेमलता काळोखे, हेमा मोरे, रत्नमाला करंडे, संतोष चव्हाण, शैला खंडागळे, वनिता देशकर हे सर्वच उमेदवार देहूगावातील असल्याने त्यांनी आपापल्या केंद्रांवर सकाळी आठच्या आतच मतदानाचा हक्क बजावला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावण्यास सुरवात केली. सकाळी गावात गर्दी होऊ लागली असता येथील उपविभागीय अधिकारी मुजावर व पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले. पोलिसांच्या वतीने चौकात गर्दी करू नये वाहतुकीस अडथळा ठरेल अशी वाहने आणि हातगाड्या हटविण्याची वारंवार उद्घोषणा ध्वनिक्षेपकावरून केली जात होती. पहिल्या दोन तासात केवळ पाच ते सहा टक्केच मतदान झाले होते. सकाळी साडेअकरापर्यंत हे प्रमाण १३ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान होते. दुपारी दीडच्या सुमारास मतदानाची टक्केवारी वीस टक्क्याच्या आसपास होती. दुपारी तीन वाजल्यानंतर मात्र सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी वाढत जाऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदानाची टक्केवारीही वाढू लागली होती. सकाळी १२च्या सुमारास काही विठ्ठलनगर येथील १३ नंबरच्या व माळीनगर येथील १६ नंबर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. तेथे काहीशा रांगा लागल्याहोत्या. (वार्ताहर) येथील दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या भुजबळ व दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या भरत विष्णू काळोखे, शरद खोल्लम यांनी केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. स्लिप वाटण्याचे कष्ट न घेतल्याने मतदारांना विविध पक्षांच्या बूथवरून नाव शोधावे लागत होते. काही कार्यकर्ते मोबाइलवर डाऊनलोड केलेल्या अ‍ॅपवर ता शोधून देत होते. मात्र वृद्ध व महिलांना त्यांचा शोध घेणे व मतदानाला जाणे जाचक वाटत होते. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक केंद्रासाठी बीएलओची नेमणूक केली होती. मात्र त्यांना मतदारांचे नाव शोधण्यासाठी वेळ जात होता. त्यामुळे मतदान केंद्राच्या आवारात गर्दी राहत होती. काही उमेदवारांचे कार्यकर्ते मतदान केंद्रामधूनच मतदारांना काही काळ आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करीत होते. पोलीस त्यांना वारंवार बाहेर काढत होते. मात्र, कार्यकर्ते काही ना काही कारण काढून थांबत होते. बहुतेक सर्वच उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना हॉटेलची कूपन दिली होती. हॉटेलमध्ये कूपन देऊन नाष्टा दिला जात होता, तर काही उमेदवारांनी जेवणाची व्यवस्था केली होती. कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली होती. सकाळी मतदानासाठी आलेल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. हा उपक्रमाचे कौतुक करीत मतदार मतदानाला गेले. हा उपक्रम नागरी हक्क मंच व कर्तव्य फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला.