देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांचा राजीनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:52 PM2018-08-02T14:52:13+5:302018-08-02T14:54:34+5:30

भाजपमध्ये झालेल्या अंतर्गत समझोत्याप्रमाणे गतवर्षी सतरा जुलैला झालेल्या बैठकीत खंडेलवाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती.

Dehurod Cantonment Board Vice President Vishal Khandelwal resigns | देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांचा राजीनामा 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांचा राजीनामा 

Next
ठळक मुद्देभाजपच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या सारिका नाईकनवरे यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी जाहीर

देहूरोड : देहूरोड  कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदाचा विशाल खंडेलवाल यांनी गुरुवारी दुपारी राजीनामा बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांच्याकडे दिला आहे. गुरुवारी सायंकाळी होणाऱ्या बोर्डाच्या विशेष बैठकीत वॉर्ड क्रमांक दोनच्या बोर्ड सद्स्या सारिका नाईकनवरे यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने निश्चित करण्यात आले असून त्यांची निवड निश्चित मानली जात आहे . 
    कॅन्टोन्मेंट बोर्डाची अकरा जानेवारी २०१५ ला सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर भाजपकडून अ‍ॅड. अरुणा पिंजण, सारिका नाईकनवरे, विशाल खंडेलवाल व ललित बालघरे असे चार , काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू व गोपाळराव तंतरपाळे हे दोघे तसेच भाजपचे बंडखोर रघुवीर शेलार यांची निवड झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या उपाध्यक्षपदी सुरुवातीला बालघरे व त्यानंतर पिंजण यांना संधी देण्यात आली. भाजपमध्ये झालेल्या अंतर्गत समझोत्याप्रमाणे पिंजण यांनी राजीनामा दिल्यानंतर गतवर्षी सतरा जुलैला झालेल्या बैठकीत खंडेलवाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने गुरुवारी (दि.२आॅगस्ट )खंडेलवाल यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गुरुवारी सायंकाळी तातडीने होणाऱ्या बोर्डाच्या विशेष बैठकीत राजीनामा मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, खंडेलवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या सारिका नाईकनवरे यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी जाहीर केल्याची माहिती मिळाली आहे.. कॅन्टोन्मेंट बोर्डात सातपैकी चार सदस्य भाजपचे असल्याने नाईकनवरे यांची निवड निश्चित मानली जात असून बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत  आहे.  .

Web Title: Dehurod Cantonment Board Vice President Vishal Khandelwal resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.