शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

देहूरोड बाजारपेठेतील दुकानांना लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 3:59 AM

येथील बाजारपेठेतील मंडईसमोरील लोहमार्गाच्या भिंतीला लागून असलेल्या तीन दुकानांना लागलेल्या आगीत लहान मुलांच्या सायकल विक्रीचे दुकान भस्मसात झाले. त्या शेजारील चप्पल व किराणा दुकानालाही आग लागली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

देहूरोड - येथील बाजारपेठेतील मंडईसमोरील लोहमार्गाच्या भिंतीला लागून असलेल्या तीन दुकानांना लागलेल्या आगीत लहान मुलांच्या सायकल विक्रीचे दुकान भस्मसात झाले. त्या शेजारील चप्पल व किराणा दुकानालाही आग लागली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.कॅन्टोन्मेंट बोर्डासह डीएडी, सीओडी, आयुध निर्माणी, चाकण एमआयडीसी व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या सहा बंबांच्या मदतीने जवानांनी व नागरिकांच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यास यश आले. कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अत्याधुनिक बहुउद्देशीय बंब सर्वांत अगोदर वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने पाण्याचा जोरदार मारा केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अत्याधुनिक आग विझविण्यासाठी यंत्रणा बसविलेला पाण्याचा टँकर घटनास्थळी आला. वेगाने पाण्याचा मारा केल्याने सायकल दुकान वगळता इतरत्र पसरत चाललेली आग कमी करण्यात यश मिळाले अन्यथा सर्वत्र आग पसरून रांगेतील दुकानांना आगीचा फटका बसला असता. अकराच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिका, देहूरोड आयुध निर्माणी, तसेच सीओडी व त्यानंतर चाकण एमआयडीसी, डीएडीचे सहा अग्निशामक बंब दाखल झाले.देहूरोड येथील महात्मा फुले भाजी मंडईसमोर जुन्या रेल्वे फाटकापासून लोहमार्गाच्या बाजूने अनेक व्यापाऱ्यांची मोठी टपरीवजा दुकाने आहेत. यातील रवी खन्ना यांच्या मालकीचे टॉय अँड वाईड हे लहान मुलांच्या सायकलचे दुकान सकाळी त्यांनी उघडल्यानंतर काही वेळानंतर दुकानाच्या मागील बाजूने धूर येत असल्याचे निदर्शनास आले. दुकानाला लागलेली आग वेगात वाढू लागल्यानंतर शेजारी असलेल्या जिंदाल प्रोव्हिजन स्टोअर, तसेच ए वन फूट वेअर या चप्पल दुकानालाही आगीचा मोठा फटका बसला. किराणा दुकानातील बहुतांश सामान व्यापाºयांनी हलविल्याने मोठे नुकसान टाळल्याचे मौंटी जिंदाल यांनी सांगितले. ए वन फूट वेअर या चप्पल दुकानाला आगीची मोठी झळ लागून दुकानातील सुमारे चार लाखांहून अधिक मालाचे नुकसान झाल्याचे मालक महंमद युसूफ यांनी सांगितले. बाजारपेठेतील व्यापारी, मंडईतील गाळेधारक, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी विविध दुकानांतील सामान हलविण्यास व आग विझविण्यास मदत केली.दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी आग पूर्ण विझली होती. आगीत सायकल दुकानातील सायकलींसह जळलेल्या सामानाच्या नुकसानीची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या दुकानात सायकलींसह मोठ्या प्रमाणात फटाके साठा असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली असून, फटाक्यांमुळे आग वेगाने पसरत जाऊन मोठे नुकसान झाले आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ए. एम. लांडगे व पोलीस कर्मचाºयांनी बाजारपेठेतील दोन्ही बाजूंचे रस्ते बंद करून बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवत आग विझविण्यातही अग्निशामक दलाच्या जवानांना सहकार्य केले. आगीचे निश्चित कारण समजले नसून, सायकल दुकानातील नुकसानीबाबत संबंधित दुकानदाराकडून अद्याप माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.दरम्यान आगीच्या घटना घडू नयेत यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड परिसरामध्येही चिखली-कुदळवाडी परिसरामध्ये वारंवार आगीच्या घटना घडतात. भंगारमालाला लागलेल्या आगी विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्याही वेळेवर पोहचत नाहीत. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी जवानांना मोठ्याप्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. प्रशासनाने अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे.धोका टळला : जवानांची तत्परताआगीची माहिती मिळताच देहूरोड रुग्णालय येथे टाकीवरून पाणी भरत असलेला देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अत्याधुनिक आग विझविण्यासाठी यंत्रणा बसविलेला पाण्याचा टँकर घटनास्थळी आला. वेगाने पाण्याचा मारा केल्याने सायकल दुकान वगळता इतरत्र पसरत चाललेली आग कमी करण्यात यश मिळाले अन्यथा सर्वत्र आग पसरून रांगेतील दुकानांना आगीचा फटका बसला असता. टँकरचे पाणी संपताच अकराच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिका, देहूरोड आयुध निर्माणी, तसेच सीओडी व त्यानंतर चाकण एमआयडीसी, डीएडीचे सहा अग्निशामक बंब दाखल झाले. पाण्याचा जोरदार मारा करूनही सायकल दुकानाच्या पोटमाळ्यावरील सायकली व सामानाला लागलेली आग आटोक्यात येत नव्हती. अखेर सीओडी व डीएडीच्या फायरब्रिगेडच्या जवानांनी दुकानाचे वरचे पत्रे काढून पाण्याचा जोरदार फवारा मारून आग विझविण्यात यश मिळविले.

टॅग्स :fireआगnewsबातम्या