नेहरुनगर : संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने देहूगाव येथे हिवाळी शिबीर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना युनिट संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय यांच्या वतीने देहूगाव येथे दि. ३ ते ९ जानेवारी या कालावधीत ‘हिवाळी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.देहूगाव परिसरातील ग्रामस्थ व भाविकांची आरोग्य तपासणी, शालेय विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना मोफत मेडिसिन व आयुर्वेदिक औषधे वाटप करण्यात आली. शिबिरासाठी संत तुकाराममहाराज संस्थान ट्रस्टचे हभप शांताराम मोरे, संतोष साकोरे व दत्तात्रय येळवंडे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश माने, सह कार्यक्रमाधिकारी डॉ. मंगेश उदमले व शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते. (वार्ताहर)
आयुर्वेद विद्यालयाचे देहूत शिबिर
By admin | Published: January 14, 2017 2:47 AM