लोकमत न्यूज नेटवर्कनिगडी : भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येणाऱ्या बस टर्मिनलचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे तसेच टर्मिनलचे ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनल’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. निवेदन देते वेळी नगरसेविका कमल घोलप, उमेश घोडेकर, बापू घोलप, कौस्तुभ देशपांडे, दिलीप पवार आदी उपस्थित होते. निगडीतील बस टर्मिनल हे भक्ती-शक्ती चौकासह शहराच्या वाहतूक सेवेचे मूळ केंद्र असणार आहे. संपूर्ण पुणे शहरातील बस येथून धावणार आहे. या बस टर्मिनलमध्ये नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, बसण्यासाठीची असन व्यवस्था, वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. वेळापत्रक, सूचना फलक, नागरिकांच्या मदतीसाठी साह्यता केंद्र या प्राथमिक सुविधाही येथे सुरू कराव्यात, असे केंदळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
बस टर्मिनलचे काम पूर्ण करण्याची मागणी
By admin | Published: May 12, 2017 5:09 AM