पिंपरी : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाºया विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, थर्माकोलचे मखर, पर्यावरणपूरक कागदी मखर, छोट्या-छोट्या दिव्यांच्या माळा, काचेची व प्लॅस्टिकची फुले, हिटलॉन शीट, क्रिस्टल माळा, चायनीज माळा व फुले, फुलांचे विविध प्रकार एक ना अनेक नवनवीन प्रकार बाजारपेठेत आले आहेत.दरवर्षीप्रमाणे यावर्षी वेगवेगळ्या रंगसंगतीतील लहान-मोठे मखर विक्रीस आले आहेत. त्यामध्ये चौरंग, मूषकवाहक रथ, सिंहासन, कमळ यासारख्या मखरांना विशेष मागणी आहे. याशिवाय छोटी-छोटी कलात्मक झाडे, रंगीबेरंगी फुले, प्लॅस्टिकचे फुलांचे हार, तोरण यासह विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तूही मुबलक प्रमाणात विक्रीस आल्या आहेत. तसेच गणपतीसाठी खास फेटा, नक्षीकाम केलेले उपकरणे, विविध प्रकारचे हार, मोत्यांचे हार, मुकुट, रंगीत खडे आणि क्रिस्टल्सने बनविलेले आकर्षक दागिने बाजारात विक्रीसाठी आले आहेत. निसर्गप्रेमींसाठी खास इको फे्र ंडली मखर, सिंहासने बाजारात दाखल झाली आहेत. लाकडी सिंहासने, नक्षीदार आरास यामुळे पर्यावरणपूरक सजावटीसाठी या वस्तूंना मोठी मागणी होत आहे. मखर ४०० ते ३००० रुपये, प्लॅस्टिक फुले ९० ते २५० रुपये, हार ६० ते २५० रुपये, छोटी कलात्मक झाडे २५ ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सजावटीच्या साहित्याच्या किमतीमध्ये सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खास लाईट इफेक्ट असणारी थर्माकोलची मखर आकर्षण ठरली आहेत. बाप्पा मोरयाची पट्टी, टोपी, भगवे झेंडे अशा अनेक वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. घरोघरी गणेश आगमनाची तयारी तर सुरूच आहे, पण यावर्षी आरास कशी आकर्षक करता येईल याबाबत अनेक तरुण मंडळांमधूनही मंडप उभारणी तसेच सजावटीसाठीची तयारी सुरू झाली.गौरीच्या दागिन्यांना वाढली मागणी...गौैरी आवाहनाच्या कार्यक्रमाचीही महिला वर्गाकडून जय्यत तयारी सुरू आहे. चेहºयावर आनंदी भाव व्यक्त होणाºया गौैरींच्या मनमोहक मुखवट्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. ३०० ते २००० रुपयांपर्यंत या मुखवट्यांची किंमत असून, महालक्ष्मीचा आकर्षक साज खरेदी करण्यासाठी नथ, मुुकुट, बोरमाळ, नेकलेस, बाजूबंद, कमरपट्टा अशा विविध दागिन्यांना महिलांकडून मागणी वाढली आहे. महालक्ष्मी उभ्या करण्यासाठी लागणाºया आडण्यांचेही विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. फळांची आवकही वाढली असून सफरचंद, केळी, चिकूच्या किमती वधारल्या आहेत. फुलांच्या किमतीतही वाढ झाली आहे.- यंदाही सजावटीच्या सामानाने बाजारपेठा सजल्या असून, जीएसटीमुळे मात्र यंदा सजावटीच्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. जीएसटीचा फटका सहन करीत असतानाही गणेशभक्तांची फुलांच्या सजावटीलाच वाढती मागणी आहे. लाइटच्या माळा आणि थर्माकोलपासून बनविलेली मंदिरे यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या, गौरीच्या दागिन्यांना वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 4:41 AM