शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

महापालिका आयुक्तांच्या घरातून पाणी भरून देण्याची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 2:54 AM

अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरण्याची मुभा मिळावी, असे विनंती करणारे पत्र अपना वतन संघटनेने आयुक्तांना दिले आहे.

वाकड : येथील अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरण्याची मुभा मिळावी, असे विनंती करणारे पत्र अपना वतन संघटनेने आयुक्तांना दिले आहे.येथील महिलांना पूर्वी पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत होती. पाण्याची सोय नसल्याने येथे वादविवाद, भांडण-तंटे होत होती. येथील नागरिकांच्या वतीने अपना वतन संघटनेने वारंवार महापालिकेशी पत्रव्यवहार करून वेळप्रसंगी आंदोलने केली. त्यामुळे २०१४ मध्ये या ठिकाणी पाण्याची लाइन टाकण्यात आली. परंतु ग्रुप कनेक्शन देण्यात आले. पाच जणांमध्ये एक कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे पाच दिवसातून एका व्यक्तीचा पाण्याचा नंबर येतो. पूर्वी पाण्याचा प्रेशर चांगला असल्याने काही अडचणी आल्या नाहीत. परंतु २०१७च्या निवडणुकीनंतर आजतगायत या अण्णा भाऊ साठेनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येऊ लागले. एकतर पाच दिवसांतून नंबर, त्यात प्रेशर नसल्याने नागरिकांना पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांसह संबंधित पाणीपुरवठा अधिकाºयाकडे तक्रार केली. परंतु त्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे.तसेच काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: वरच्या मजल्यावर पाणी पोहोचत नसल्याचे नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदील झाल्याचे चित्र दिसत आहे.सध्या येथील नागरिकांना पाण्याअभावी असंख्य अडचणीला सामोरे जावे लागत आहे. घरगुती कामे करण्यासाठी व पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील नागरिकांचा पाणीपुरवठा तातडीने मुबलक व सुरळीत करावा. येत्या शुक्रवारपर्यंत येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सर्व महिला १६ सप्टेंबरला सकाळी हंडा-कळशी घेऊन आयुक्तांच्या निवासस्थानी पाणी भरण्यासाठी येतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणे