पिंपरी : पिंपरी : भक्ती-शक्ती चौकातील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा नियोजित मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करून तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चौकातील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम स्थगित करून नवीन आराखडा तयार करून मेट्रो, राज्य शासन आदींकडून नवीन आराखड्यास मंजुरी घेण्यात यावी. मेट्रोने मंजुरी दिलेल्या आराखड्यानुसार येथील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम करावे, अशी मागणी भाजपाकडून होत आहे.भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येणाºया उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरमुळे नियोजित मेट्रो, मोनो रेलसह अन्य प्रकल्पांना बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचा आराखडा रद्द करून नव्याने आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटच्या आराखड्याचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्याचे संबंधित अधिकाºयांना सूचना दिल्या. त्यानुसार संबंधित अधिकारी अतिरिक्त शहर अभियंता राजन पाटील यांनी सदरचे प्रेझेंटेशन केले़ मात्र या सादरीकरणातून मेट्रो, मानोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करण्यात आल्याचे दिसून आले नाही. सादरीकरणात या नियोजित प्रकल्पांबाबत माहिती नमूद नाही.
मेट्रोच्या आराखड्यानुसार कामे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:39 AM