पिंपरी - व्यवहारात दहा रुपयांचे नाणे चलनात आहे. ते नाणे चलनात स्वीकारले जावे, अशा सूचना दिल्या आहेत. असे नाणे घेण्यास कोणी विरोध केल्यास त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले असताना, काही व्यापारी हे नाणे घेण्यास नकार देत आहेत. अशीच घटना पिंपरी, गांधीनगर येथे गुरूवारी दुपारी घडली असून, पोलिसांनी एका दुकानदाराविरुद्ध रविवारी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचना असताना, दहाचे नाणे नाकारणाºया दुकानदाराविरोधात तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकालाच पोलिसांनी उर्मट वागणूक दिली.गांधीनगरमध्ये राहणाºया लाखन केवल रावळकर (वय ३८) यांनी तक्रार दिली आहे. लाखन यांच्या पत्नी तांदूळ आणण्यासाठी किराणा मालाच्या दुकानात गेल्या. त्या वेळी परिसरातील दुकानदारांनी त्यांच्याकडील दहाची नाणी स्वीकारण्यास नकार दिला. चौधरी नावाच्या दुकानदाराने नाणी परत केली. तक्रारदाराने दुकानदाराला नाणे नाकारण्याबाबत जाब विचारला. त्या वेळी नाणे चलनातून बाद केले आहे, असे उत्तर दुकानदाराने दिले. त्यानंतर लाखन यांनी शंभर नंबरवरून पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून उद्धट वागणूक मिळाली, असा तक्रारदाराने आरोप केला आहे. दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणाºया दुकानदारांविरोधात संत तुकारामनगर पोलीस चौकीत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.गांधीनगर येथील किराणा मालाचे दुकानदार गोविंद चौधरी, सुरेश चौधरी व आणखी एक व्यापारी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.पोलीस अनभिज्ञ : ग्राहकांना मनस्तापपिंपरी पोलिसांना याबाबत कळविले मात्र, त्यांनी या घटनेकडे गांभिर्याने पाहिले नाही. तक्रारदारास उर्मट वागणूक देत ते म्हणाले, दहा रुपयाचे नाणे चलनात नाही तर तू दुकानदाराला कशासाठी दिले? तुलाच पोलीस कोठडीत टाकतो, असे सुनावले. तक्रार देण्यास गेलेल्या ग्राहकास पोलिसांकडून योग्य प्रकारे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विष्णू सरपते व इतरांची मदत घेतली. संत तुकारामनगर पोलीस चौकीत जाऊन संबंधित व्यापाºयांविरुद्ध तक्रार दाखल करून घ्यावी असा आग्रह धरला. रिझर्व्ह बँकेने दहा रुपयाचे नाणे चलनातून बंद केले नसताना ग्राहकांची अडवणूक केली जात आहे. पोलिसांनी याची गांभिर्याने दखल घ्यावी, असे सांगितल्यानंतर व्यापाºयांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
दहाचे नाणे नाकारले; व्यापाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 3:38 AM