"पुरुषांपेक्षा महिला स्मूथ रिक्षा चालवतात"; पिंपरीत अजितदादांचा पिंक रिक्षामधून प्रवास
By विश्वास मोरे | Published: August 16, 2024 09:50 PM2024-08-16T21:50:24+5:302024-08-16T21:50:47+5:30
जन सन्मान यात्रा निगडीत आली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंक रिक्षातून प्रवास केला.
विश्वास मोरे
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिक्षा पंचायतीच्या वतीने निगडी येथे महिलांचे रिक्षा स्टॅन्ड आहे. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जन सन्मान यात्रा निगडीत आली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंक रिक्षातून प्रवास केला.
मावळातून जन सन्मान यात्रा सायंकाळी पिंपरी चिंचवड शहरात आली. त्यावेळी निगडी चौकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला रिक्षा स्टॅन्ड ला पवार यांनी भेट दिली.
निगडीयेथील देशातील पहिले महिला रिक्षा स्टॅन्ड येथील रिक्षा मधून अजित दादा पवार यांनी रिक्षाने निगडी पर्यंत प्रवास केला. यमुना काटकर या रिक्षा चालवत होत्या तर अजितदादांच्या शेजारी महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे उपस्थित होत्या. याविषयीचा किस्सा आणि अनुभव अजित पवार यांनी सभेत सांगितला.
"निगडी येथे कष्टकरी कामगार पंचायतीचे नेते बाबा कांबळे यांनी महिलांचे रिक्षा स्टँड सुरू केले आहे. त्या रिक्षातून मी आज प्रवास केला. बीड जिल्ह्यातून येऊन यमुनाताई काटकर यांनी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. काटकर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने रिक्षा चालवली. पुरुषांपेक्षा महिला स्मूथ रिक्षा चालवतात असा अनुभव आला," असे अजित पवार म्हणाले.