पिंपरी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.विविध योजनांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग घेतल्याबद्दल सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट उपक्रम राबवणाºया महाविद्यालयांना पारितोषिके दिली जातात. कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या हस्ते पुणे येथील समारंभात महाविद्यालयास गौरविण्यात आले.महाविद्यालयात एन. सी. एल. चे शास्त्रज्ञ डॉ. अशोक गिरी, विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागप्रमुख डॉ. राम गंभीर, डॉ. संजय कप्तान, डॉ. रवींद्र जायभाये, वन विभागप्रमुख शिवाजीराव फंटागरे आदींनी महाविद्यालयास भेट देऊन मार्गदर्शन केले. महाविद्यालयाला डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे डॉ. पी. डी. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त भाग्यश्री पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांचे उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन लाभले.योजना राबविताना विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा. मुकेश तिवारी, डॉ. विजय गाडे, प्रा. गणेश फुंदे, स्टाफ सेक्रटरी प्रा. शरद बोडखे, प्रा. अंजली आकिवाटे, प्रा. मिनल भोसले, प्रा. अर्चना ठुबे, अमित साळुंखे तसेच इतर प्राध्यापकांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच हे शक्य झाले असे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी सांगितले. या यशात प्राचार्य डॉ. वामन, प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले.महाविद्यालयाने गतवर्षी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी या साठी अविष्कार उपक्रम राबविला. राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर कळसुबाई, हरिश्चंद्र गड अभयारण्य या ठिकाणी आयोजित केले होते. शिबिराला तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी भेट दिली. स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी विद्यापीठस्तरीय स्वच्छ भारत अभियान शिबिर रतनवाडी, हरिश्चंद्रगड या ठिकाणी आयोजित केले. विद्यापीठस्तरीय जैवविविधता शिबिर भीमाशंकर येथे आयोजित करण्यात आले. वन विभाग दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला प्राणीगणना उपक्रम राबवितो. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
‘डीवाय’ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, विद्यापीठाकडून गौरव, विविध उपक्रमांच्या आयोजनाची घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 3:26 AM