शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 2:26 PM

पवनाथडी कोेठे घ्यायची यावरून दरवर्षी वाद होत असतात.वाद होण्याची परंपरा कायम राखली आहे.

ठळक मुद्देजानेवारीला पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्याबाबतचा ठराव यंदाची जत्रा भोसरी की चिंचवड यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद, वाद निर्माण

पिंपरी : महिला बचतगटांसाठी बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. दरवर्षी या जत्रेत वाद होण्याची परंपरा कायम राखली आहे.यंदाची जत्रा भोसरी की चिंचवड यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद, वाद निर्माण झाले आहे. महिला व बालकल्याण समितीने दोन परस्परविरोधी ठराव केले आहेत. त्यामुळे नक्की जत्रा कोठे होणार याबाबत संभ्रम आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा झाली.अध्यक्षस्थानी स्वीनल म्हेत्रे होत्या. पुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर महापालिकेने गेल्या बारा वर्षांपासून पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रा भरविली जाते. पवनाथडी कोेठे घ्यायची यावरून दरवर्षी वाद होत असतात. चिंचवड आणि भोसरीवरून पुन्हा वाद झाला. दरवर्षी जत्रेबाबत शेवटपर्यंत गोंधळ सुरू असतो. महिला व बालकल्याण समितीच्या सभेत अगोदर भोसरीगाव जत्रा मैदान येथे जानेवारीला पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्याबाबतचा ठराव केला. त्यानंतर पुन्हा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारीला पहिल्या अथवा दुस-या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्याचा ठराव केला. त्यामुळे यंदाची जत्रा नक्की कोठे होणार याबाबत संभ्रम आहे. सभापती स्वीनल म्हेत्रे म्हणाल्या, समितीने यापूर्वी पवनाथडी जत्रा भोसरीगाव जत्रा मैदान येथे भरविण्याबाबतचा ठराव केला होता. मात्र, आता त्यात बदल करून सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारीला पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्याचा ठराव करण्यात आला आहे. ठिकाण बदल करण्याचे कारण सांगता येणार नाही.शिवसेनेच्या सदस्या मीनल यादव म्हणाल्या, पवना पवनाथडी जत्रा भोसरीगाव जत्रा मैदान येथे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भरविण्याबाबतचा सभेत ठराव करण्यात आला आहे. त्यानंतर सत्ताधा-यांनी ठिकाणामध्ये बदल केल्याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही. 

टॅग्स :Puneपुणेbhosariभोसरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड