शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

दिघीकरांनी काढली रात्र जागून

By admin | Published: November 24, 2015 12:54 AM

येथील काटे वस्ती विनायक पार्क, होरीझन शाळा, कृष्णानगर, गोल्डन बेकरी, विजयनगर, बी. यू. भंडारीसारख्या उच्चभ्रू सोसायट्या व इतरत्र भागातील घराघरांत कुठे गुडघाभर,

दिघी : येथील काटे वस्ती विनायक पार्क, होरीझन शाळा, कृष्णानगर, गोल्डन बेकरी, विजयनगर, बी. यू. भंडारीसारख्या उच्चभ्रू सोसायट्या व इतरत्र भागातील घराघरांत कुठे गुडघाभर, तर कुठे कमरेएवढे पाणी साचले. रात्रभर जागरण करीत व घरातील पाण्याचा उपसा करीत दिघीकरांनी रात्र घालवली. पावसाळी गटार नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.काटेनगर, विजयनगर परिसरातील विनायक पार्क भागातील रस्त्यावरची विद्युत विभागाची डीपी पडली आहे. या भागातील लालचंद बाबूलाल परदेशी, किसन लिम्बडकर, संजय मोरे अनेकांच्या घरात व घराच्या कानाकोपऱ्यात पाणीच पाणी झाले आहे. या भागातील घरा-घरांत पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यावरही पाणीच पाणी वाहत असलेले दिसून आले. याच परिसरात असलेल्या होरीझन शाळेजवळील मुरलीधर लोखंडे यांच्या घरात जवळपास कमरेइतके पाणी साचल्यामुळे अख्खा परिवार रात्रभर पाणी काढत राहिला. तरीही दुपारी बारापर्यंत पाणी हटवण्याची प्रक्रिया सुरूच होती. डोंगर भागातून मोठा उतार असल्यामुळे उंचावरून वेगाने वाहणारे पाणी थेट त्याच वेगात खाली येते. हे थेट आलेले पाणी वाहणारी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे येथून आलेले पाणी बी यू भंडारी, वाटिका, स्पार्कल अ‍ॅव्हेन्यू या उच्चभ्रू सोसायट्यांकडे वळते होते. याच भागातील बी यू भंडारी सोसायटीतील प्लॉट क्र ६८ची भयंकर दयनीय अवस्था झाली असून, येथील तळमजला भागातील प्रत्येक सदनिकेत पाणीच पाणी झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात होणारी ही परिस्थिती या भागातील नाागरिकांनी अनुभवली असून, त्याच्यावर कायमचा उपाय होत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी नोंदवल्या, तर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शेंडगे यांनी सांगितले की, डोंगराकडून आलेले पाणी वाहण्यासाठी मोठा ओढा होता. तो ओढाच नष्ट करून त्यावर उंच इमारती उभ्या केल्या आहेत. हाच नैसर्गिक ओढा प्रवाहित असता तर असा भयंकर प्रसंग आमच्यावर आला नसता. दिघी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, संतोष बबन वाळके, विश्वकांत वाळके आदींनी मदत केली. दिवसभर गारठा जाणवत होता. अचानक पाऊस आल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. तसेच बसथांब्यावरही अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांना भिजण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याने प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले. निवारा शेडचाही वापर करता आला नाही.(प्रतिनिधी)