शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

प्लॅस्टिक पिशवीला फाटा देत दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:17 AM

विद्यार्थ्यांनी केले भारुडाचे सादरीकरण, वेशभूषेने वेधले उपस्थितांचे लक्ष्य

पिंपरी : हरिनामाचा अखंड जयघोष म्हणजे वारी. टाळ-मृदंगाचा गजर म्हणजे वारी..भक्तीची कसोटी म्हणजे वारी... लोकरंगाची उधळण म्हणजे वारी. या वारीचे छोटेसे अनोखे रूप गणेशनगर थेरगाव येथील प्रज्ञा बालक मंदिर, विद्यामंदिर, माध्यमिक, द लिटिल टायगर कब्स प्रायमरी स्कूल या शाळेमध्ये पाहायला मिळाले.दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यानी विठ्ठल-रुक्मिणी, तसेच ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मुक्ताबाई यांच्या वेशभूषा करून आनंदाने अभंग, आरती, भारूड यांचे गायन केले. संस्थेच्या संचालिका भारती गवळी यांनी पालखीचे पूजन केले. रोहिणी वहिल व विद्यार्थ्यांनी पालखीस रांगोळी, गुलाल व फुलांनी पाय घड्या घालून दिंडीचे स्वागत केले. वारकरी यांनी माऊली माऊली या गाण्यावर ताल धरून रिंगण केले. विठ्ठल विठ्ठल म्हणत टाळ गजरामध्ये परिसर दुमदुमून गेला.विशेष म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीला फाटा व कापडी पिशवीला मान म्हणून विद्यार्थ्याने हाताने तयार केलेल्या ३०० कापडी पिशव्यांचे वाटप परिसरातील नागरिकांना व पालकांना विठ्ठल रूक्मिणीच्या हस्ते करण्यात आले. दिंडीमध्ये पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या दिंडी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे यांनी केले. विदयार्थ्यांना रिंगण करण्यास मार्गदर्शन राजेश्र्वरी होनमाने व शीतल गौंड यांनी केले. शाळेतील शिक्षिकांनी फुगड्या खेळून आनंद घेतला. पालखीचे छोटेसे रूप विद्यार्थ्यांनी पालकांनी व शिक्षिकांनी अतिशय उत्सुकतेने व आनंदाने पार पाडले.शहर परिसरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. बालवारकऱ्यांनी काढलेल्या प्रभातफेरीमध्ये पालक व नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी सामाजिक संघटनांनी फराळ वाटप केले.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड