पिंपरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेतर्फे डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सहकार्याने पिंपरीतील एचए मैदानावर १७ ते २० मार्च दरम्यान राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हे प्रदर्शन प्रथमच होत आहे. अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री राम सातपुते, डिपेक्स स्वागत समितीचे सचिव दीपक पांचाळ व डिपेक्सच्या निमंत्रक प्रा. सरिता बलशेटवार यांनी पत्रकार परिषदेत डिपेक्सची माहिती दिली. एचए मैदानावरील डिपेक्सच्या प्रांगणाचे डॉ. एपीजे अब्दुल कलामनगर असे नामकरण करण्यात आले आहे. उद्घाटन १७ मार्चला सायंकाळी सहा वाजता संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संशोधन व विकास आस्थापनेचे संचालक डॉ. व्ही. व्ही. परळीकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाचा समारोेप, पारितोषिक वितरण समारंभ २० मार्चला सायंकाळी सहा वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष छगनभाई पटेल उपस्थित राहणार आहेत. परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे. १८ मार्चला सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत ‘लव्ह भारत, सर्व्ह भारत’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. (प्रतिनिधी)
शुक्रवारपासून ‘डिपेक्स’ प्रदर्शन
By admin | Published: March 17, 2017 2:08 AM