लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील रिंगरोडबाबतचे नागरिकांचे आंदोलन सध्या प्रभावीपणे सुरू आहे. या प्रश्नावर महापालिका सभेत चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती. सभेत कोणी मागणी केल्यास यावर चर्चा करू, असे महापौर आणि सत्तारूढ पक्षनेत्यांनी माध्यमांना सांगिल्याने गुरुवारच्या सभेत यावर चर्चा होणार आहे.प्राधिकरण परिसरातील रिंगरोड तीस वर्षांनंतर करण्याचे प्रशासनास कसे सुचले? त्यामुळे हजारो कुटुंबे बाधित होत आहेत. रिंगरोडचा प्रश्न गंभीर असून याचे राजकीय भांडवल न करता हा प्रश्न सोडविला पाहिजे. त्याची नागरिकांनाच का, रिंगरोडमधील जमीन विकणाऱ्या दलालांवरही कारवाई व्हायला हवी. दोषी अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी. पर्याय असेल तर रिंगरोडचा अट्टहास कशासाठी, असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केला होता. तसेच या प्रश्नासाठी महापालिकेने विशेष सभा किंवा लक्षवेधी घ्यावी, अशी मागणीही केली होती.
रिंगरोडवर आज चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 5:12 AM