पिंपरी : शहर स्मार्ट सिटी होऊ घातले असताना पिंपरी-चिंचवडमधील अंधश्रद्धा काही कमी होत नाहीत. येथील स्मशानभूमीला लागून असलेल्या रस्त्यावर लिंबू, मिरची व इतर उतारा म्हणून केलेल्या वस्तू सर्रास पाहायला मिळतात. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये अंधश्रद्धा फोफावत चालली असल्याचे पाहयला मिळते. विद्यार्थ्यांना हसत खेळत विज्ञान समजून घेता यावे म्हणून महापालिकेतर्फे चिंचवड येथे सायन्स पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कमधून विज्ञानाचे धडे दिले जात असतानाच अंधश्रद्धेबाबतची ही विदारकता शहरवासीयांची मानसिकता स्पष्ट करते.येथील स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणावर उताऱ्याचे साहित्य पाहयला मिळते. रस्त्यावर लिंबू, मिरच्या, बिबवे व काळ््या बाहुल्या टाकल्या जातात. अनेक ठिकाणी नारळावर हळद, कुंकू लावून रस्त्याच्या मधोमध ठेवले जाते. त्यामुळे शाळेत जाणारे लहान मुले घाबरतात. या गोष्टीने माणसाच्या जीवनावर काहीही फरक पडत नसला तरी पालकांच्या मनातही भीतीचे वातावरण पसरले आहे.शाहू, फुले व आंबेडकरांच्या कर्मभूमी असलेल्या पुणे शहरामध्ये आजही अंधश्रद्धेला मानून लोक राहत आहेत. शैक्षणिक आणि औद्योगिक वारसा लाभलेल्या आपल्या शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. मात्र दुसरीकडे शहरातील स्मशानभूमीमध्ये उतारे करून लिंबू, मिरची टाकल्या जातात. मागील अनेक अंधश्रद्धेच्या घटनांमुळे शहरामध्ये चर्चेला उधाण आले होते. त्यातच अशाप्रकारे शहरात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाºया गोष्टी घडत असल्यामुळे शहरातील वातावरण बिघडत आहे. ज्या वेळी लोक सुशिक्षित नव्हते, त्या काळी अशाप्रकारे कर्मकांडे केली जात होती. परंतु आज समाज सुशिक्षित झाला आहे.आज चालणाºया या वाईट प्रथांमुळे पुढील पिढीवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे या कुप्रथा समाजाने थांबवल्या पाहिजे. लिंबू, मिरची हे अन्नपदार्थ आहेत़ त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्व असतात. त्यामुळे त्याची अशाप्रकारे नासाडी करणे थांबवले पाहिजे’’, अशी अपेक्षा सुजाण नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही संधीसाधू नागरिक सर्वसामान्यांमध्ये अंधश्रद्धा पसरवून गैरफायदा घेतात. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.1वाहनांना लिंबू-मिरची, बिब्बा तारेला बांधून अंधश्रद्धेचे दर्शन घडविले जाते. दर शनिवारी अशा प्रकारे लिंबू मिरची वाहनांना लावण्यात येते. जुने झालेले लिंबू मिरची काढून ते भररस्त्यात, तीन रस्ते एकत्र येणाºया ठिकाणी टाकण्यात येते. लिंबू मिरची अडकवलेल्या तारा रस्त्यात पडून त्यामुळे वाहने पंक्चर होण्याचेही प्रकार घडतात.2वाहनांना दृष्ट लागू नये म्हणून काळ्या बाहुल्या, चप्पलचाही वापर सर्रास केला जातो. वाहनाच्या मागच्या किंवा पुढच्या बाजूला बाहुली किंवा चप्पल अडकवलेली असते.जी काही समस्या असेल त्यावर वैज्ञानिक कारणे शोधली पाहिजेत. त्यासाठी मांत्रिक-तांत्रिक करून काहीही होत नाही. लिंबू, मिरची टाकून कुणाचेही चांगले अथवा वाईट होत नाही. या गोष्टी लक्षात घेऊन नागरिकांनी अशा अंधश्रद्धांपासून दूर राहयला पाहिजे. माणसांनी संतांच्या शिकवणुकीप्रमाणे वागायला पाहिजे. संतांनी अनेक वर्षांपूर्वी या कर्मकांडावर लिहून त्याचा विरोध केला आहे.’’- मिलिंद देशमुख, अंनिस, महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव
लिंबू, मिरचीची भीती?, सायन्स पार्क असलेल्या उद्योगनगरीतील विदारकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:36 AM