पिंपरी: सामाईक विहिरीच्या पाण्याचे हक्क आणि वापराच्या कारणावरून आठ जणांनी मिळून एकावर खुनी हल्ला केला. सुसगाव येथे गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या ही घटना घडली आहे. प्रमोद दशरथ ससार (वय 36, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून महेंद्र राम ससार, बजरंग राम ससार, सुरज हरिश्चंद्र पडवळ, वैभव हरिश्चंद्र पडवळ आणि अन्य चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससार आणि आरोपींमध्ये असलेल्या विहिरीच्या पाण्याचे हक्क आणि वापराच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यातून गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपींनी ससार यांना अडवले. सुरज पडवळ याने तलवारीने, महेंद्र, बजरंग आणि वैभव यांनी लोखंडी रॉडने तर अन्य आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादी यांना मारले. यात ते गंभीर जखमी झाले. आरोपींच्या तावडीतून सुटून जात असताना आरोपींपैकी एकाने गोळीबार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.