शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

धरणग्रस्त व्यावसायिकांना शासकीय यंत्रणांकडून त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:17 AM

पवना धरणग्रस्त कृती समिती : आढावा बैठकीत मांडल्या समस्या, आंदोलनाचा दिला इशारा

पवनानगर : पवना धरणग्रस्त तरुणांनी सुरू केलेल्या व्यवसायाला शासकीय यंत्रणांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आमच्या उपजिवेकेचे साधन बनलेला व्यवसाय बंद करू देणार नाही़ प्रसंगी कोणतेही पाऊल उचलू, असा इशारा पवना धरणग्रस्त कृती समितीने दिला.

पवनानगर येथे गुरुवारी समितीची आढावा बैठक झाली. या वेळी धरणग्रस्तांनी विविध मागण्या मांडल्या. शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, कार्याध्यक्ष दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, बबनराव कालेकर, सचिन मोहिते, सुधीर घरदाळे, अनंता घरदाळे, रमेश कालेक यांच्यासह तरुण या वेळी उपस्थित होते. पवना धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने कायम दिशाभूल करून अनेक वर्षे हा प्रश्न रेंगाळत ठेवल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धरणग्रस्त तरुणांनी सुरू केलेल्या पर्यटन केंद्र बंद करण्याच्या हालचाली शासकीय यंत्रणेकडून होत आहेत. पुनर्वसन होईपर्यंत येथे व्यवसाय सुरूच राहतील, यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. पवना धरणासाठी १९६३ साली जमीन संपादन करण्यात आली. यात १२०३ खातेदार बाधित झाले. यापैकी ३४० खातेदारांना प्रत्येकी ४ एकर जमीन देऊन पुनर्वसन केले. परंतु उर्वरित खातेदारांना अद्याप मोबदला अथवा पुनर्वसन झालेले नाही. यामुळे धरणग्रस्त खातेदारांनी सन २०१३ मध्ये न्यायालयात धाव घेतली. याबाबत याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर सुनावणी सुरू आहे, असे असताना तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांनी गेल्या आठवड्यात काही कृषी पर्यटन केंद्रात जाऊन पंचनामा केला. या जागेबाबत न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थितीचे आदेश दिले असताना येथे केलेला पंचनामा हा नियमबाह्य असल्याचे तरुणांनी सांगितले.उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदनवडगाव मावळ : पवना धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने पवना धरण परिसरात कृषी पर्यटन केंद्र चालकांनी गुरुवारी मावळचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांची वडगाव भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, सचिव दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, माजी सरपंच अनंता घरदाळे, बबनराव कालेकर, शंकर घरदाळे, सुधीर घरदाळे, उपसरपंच अनंता वर्वे, रवी ठाकर उपस्थित होते. गेल्या ५० वर्षांत झालेल्या अन्यायाच्या व्यथा माजी सरपंच किसन खैरे यांनी प्रांताधिकाºयांपुढे मांडल्या. पुनर्वसन करा, तरुणांना नोकºया द्या, हा आमचा मूलभूत अधिकार आहे़ शासनाने दखल न घेतल्यास आत्मदहन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

टॅग्स :Damधरणdam tourismधरण पर्यटनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड