पिंपरी : संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर येथे झालेल्या जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरीतील डी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालय व जयहिंद स्कूलच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजविले. या स्पर्धेत अव्वलस्थान पटकाविलेल्या खेळाडूंची येरवडा येथील ग्यानबा मोझे हायस्कूलसमोरील विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे होणाºया शालेय विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. विभागीय स्पर्धा दिनांक ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत.जिल्हास्तर शालेय स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे :सुवर्णपदक विजेते. १४ वर्षांखालील मुले : (२६ ते २८ किलो) कृष्णा चितळे (जयहिंद स्कूल,पिंपरी). ३२ ते ३४ किलो : चेतन जाधव (एस.एस.अजमेरा स्कूल). ३४ ते ३६ किलो : कुणाल मोरे (एच. ए. स्कूल, पिंपरी). १७ वर्षांखालील : ५७ ते ६० किलो नितीन रणखांबे (इंदिरा हायस्कूल, पिंपरी).१९ वर्षांवरील : ४८ ते ५१ किलो : अभिषेक यादव (डी. वाय. पाटील महाविद्यालय, पिंपरी). ५७ ते ६० किलो : रझा घोषि. ६० ते ६४ किलो : प्रतीक गोडगे (डी.वाय.पाटील महाविद्यालय, पिंपरी). ६४ ते ६९ किलो : अकाश हाडके (डी.वाय.पाटील महाविद्यालय, पिंपरी).रौप्यपदक विजेते : १९ वर्षे खालील : ८१ ते ९१ किलो : घ्रहित चितळे (जयहिंद महाविद्यालय, पिंपरी).कांस्यपदक विजेते : १४ वर्षांखालील : ३४ ते ३६ किलो : संतोष जमादार (एच. ए. स्कूल, पिंपरी). ३८ ते ४० किलो : ओमकार जाधव (एच.ए.स्कूल,पिंपरी).१७ वर्षांखालील : ४४ ते ४६ किलो : तन्मय जाधव (एच. ए. स्कूल, पिंपरी). ६० ते ६४ किलो : अनिकेत तनपुरे (राजमाता महाविद्यालय, भोसरी). सर्व खेळाडूंना बळवंत सुर्वे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.मुलीचा गट :१७ वर्षां खालील : ४४ ते ४६ किलो : मीनाक्षी राजपूत (जयहिंद स्कूल,पिंपरी). ४६ ते ४८ किलो : स्नेहल तावरे (नोवेल इंटरनॅशनल कनिष्ठ महाविद्यालय).१९ वर्षांवरील : ४४ ते ४६ किलो : नेहा काकडे (नव महाराष्ट्र महाविद्यालय, पिंपरी). ४६ ते ४८ किलो : शीतल पोळ (बी. जे. एस., संत तुकारामनगर,पिंपरी). ४८ ते ५० किलो : श्वेता पवार (जयहिंद स्कूल, पिंपरी). ५४ ते ५७ किलो : संस्कृती सुर्वे (डी. वाय. पाटील महाविद्यालय, पिंपरी). विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा : शहरातील चौदा जणांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 6:24 AM