पिंपरी : लग्नात हुंडा व मानपान न दिल्याने पत्नीला तलाकनामा पाठवला आणि त्यानंतर महिला घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे ही घटना घडली आहे. या प्रकरणी गुरूवारी (दि.१७) दिघी पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासु - सासरे, दिर, जाव, नणंद (सर्व रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात मुस्लीम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन मॅरेज कायदा २०१९ कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात हुंडा म्हणून सोन्याचे दागिने दिले नाहीत तसेच मानपान केला नाही. म्हणून फिर्यादी महिलेला वारंवार टोचून बोलने आणि शिवीगाळ करून शारिरीक व मानसिक छळ केला.
तसेच आरोपी पतीने तीन वेळा तलाकनामा पाठवला. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये फिर्यादी महिला घरात एकट्या असताना आरोपीने त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.