पिंपरी : चिंचवड महापालिकेच्या वतीने सोमवारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना त्यांच्या हक्काचे घर मिळत आहे, याचा मला मनापासून आनंद असून, नागरिकांनी त्याची निगा राखावी, घरे भाड्याने देऊ नयेत, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले. केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण पेठ क्र. १७ व १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून, घरकुल प्रकल्पातील ९ सोसायट्यांच्या इमारतीमधील लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत महापौरांच्या हस्ते काढली.संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी विधी समिती सभापती सुजाता पालांडे, दिलीप गावडे उपस्थित होते.या वेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थेसाठी तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आलेल्या अध्यक्षांचा सत्कार केला. यामध्ये कैलास डांगे (इमारत क्र. बी-१४, नियोजित सोसायटी क्र.८१), नितीन गावडे (इमारत क्र. बी -२५ नियोजित सोसायटी क्र.८२), तुळशीराम रासकर (इमारत क्र.बी-१३ नियोजित सोसायटी क्र.८३), गुलाब वैरागे (इमारत क्र.सी- ७ नियोजित सोसायटी क्र.८४), काशिनाथ शिंदे (इमारत क्र. डी-२६ नियोजित सोसायटी क्र.८५), दत्तात्रय मयुर (इमारत क्र. सी-७ नियोजित सोसायटी क्र.८६), प्रमोद कांबळे (इमारत क्र. सी-८ नियोजित सोसायटी क्र.८७), संतोष कांबळे (इमारत क्र. डी-२५ सोसायटी क्र.८८), अजय मंडल (इमारत क्र. सी-५ नियोजित सोसायटी क्र. ९०) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)महापौर धराडे म्हणाल्या, ‘‘लाभार्थ्यांना त्यांच्या कष्टातून मिळणारे घर हे त्यांनी स्वत:च्या निवासाकरिता वापरावे. भाड्याने अथवा नातेवाइकांना देऊ नये. तसे लाभार्थी करणार नाही याची मला खात्री आहे. लाभार्थ्यांनी घराचा आनंद कायमस्वरूपी घ्यावा. तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. ओला व सुका कचरा वेगळा करावा. अशा प्रकारची घरकुल योजना राबविणारी आपल्या देशातील, तसेच महाराष्ट्रातील एकमेव महापालिका ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आहे, हे आपल्याला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे.’’
मिळालेली घरकुले भाड्याने देऊ नका
By admin | Published: August 25, 2015 4:37 AM