लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कस्टममध्ये तुमचे साहित्य अडकले आहे. त्यासाठी काही रक्कम आॅनलाइन भरा, असे सांगून पिंपरीगाव येथील एका डॉक्टर महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एका तरुणासह दिल्ली येथील २८ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅलेक्स अलबर्न (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनुजा गुरुमुखसिंग अरोरा (वय २५, रा. पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. अनुजा यांचे एक पार्सल कस्टम विभागामध्ये अडकले आहे. ते सोडविण्यासाठी काही रक्कम आॅनलाइन भरावी लागेल, असे सांगून १० जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत वेळोवेळी संबंधित बँक खात्यावर १ लाख ९ हजार ५०० रुपयांचा भरणा करण्यास सांगितले. मात्र, मे महिन्यापर्यंत वाट पाहूनही साहित्य मिळू शकले नसल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे धाव घेतली.
डॉक्टर महिलेची आॅनलाइन फसवणूक
By admin | Published: June 02, 2017 2:26 AM