शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

भाजपकडे एका व्यक्तीशिवाय पर्याय आहे का?; सुषमा अंधारेंचा सवाल

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: August 31, 2023 11:26 PM

पिंपरीत उद्धवश्री पुरस्कारांचे वितरण

पिंपरी : भाजपविरोधात २८ पक्ष एकत्र आले आहेत. यातील सगळे पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी टिकणार नाही, अशी टीका भाजप व त्यांनी नेमलेले कंत्राटदार करत आहेत. मात्र, इंडियाकडे एकसे बढकर एक पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. तेवढ्या ताकदीचे आणि शिकलेले ते आहेत. मात्र, गेली नऊ वर्षे झाली भाजपकडे पंतप्रधान म्हणून एकच व्यक्ती आहे. त्यांच्याकडे एकाशिवाय पर्याय आहे का, असा सवाल शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

पिंपरीमध्ये उद्धवश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी अंधारे बोलत होत्या. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, सध्या संविधानिक चौकट उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ती वाचविण्याचे काम इंडिया करत आहे. दुरुस्त्या करण्याला विरोध नाही. पण जाणीवपूर्वक राजकारणात धर्म आणला जात आहे. ते चुकीचे आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची आज गरज आहे. शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंवर टीका झाली. त्यात भाजपने सुपाऱ्या दिलेले राणे, राणा कंत्राटदार आघाडीवर आहेत. मी नीलेश अन् नितेश राणेबद्दल बोलणार नाही. त्यांच्यात संस्कार नावाच्या व्हिटॅमिन्सची कमतरता आहे. राणांना उद्धव ठाकरेंचा दम पाहायची इच्छा झाली. सगळी भाजपातील नेतेमंडळी इंडियातील २८ पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यावरून उद्धव ठाकरेंमध्ये किती दम आहे, हे सिद्ध झाले आहे.-

त्यांच्या कपटी राजकारणाला ‘शाह’ यांचा शह

अंधारे म्हणाला, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कपटी राजकारण केले. त्यामुळे त्यांचा कार्यकाल हा कपटी मुख्यमंत्री म्हणूनच ओळखला जाईल.अमित शहा यांनी अजित पवारांना सोबत घेत फडणवीस यांच्या कपटी राजकारणाला शह दिला आहे. त्यामुळे फडणवीस यांचे राजकारण संपुष्टात आले असल्याचे अंधारे यांनी सांगितले.त्यांचे तीर्थ पिऊन पवित्र झालात

महाराष्ट्रात भाजपने अजित पवारांच्या धरण वाक्यावर रान उठवले होते. शेवटी भाजपने पवारांना सत्तेत घेतले. त्यांनी धरणात जे केले त्यांचे तीर्थ घेऊन पवित्र झाले का, असा सवालही अंधारे यांनी भाजपला केला. इंडियाची बैठक मुंबईत होणार आहे. त्याची भीती सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरची किंमत कमी केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या हिताची व्याख्या ही अदानीशी आहे. त्यांना सामान्यांचं पडलेलं नाही, असा टोलाही अंधारे यांनी लगावला.शिल्लक सेनेतील लेकरे मांडीवर का घेता

भाजपचे नेते अन् सोशल मीडिया ट्रोल्स म्हणतात, आता शिवसेना राहिली नसून ती शिल्लक सेना झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जर शिल्लक कोणी नाही राहिले तर शिल्लक सेनेतील लेकरे मांडीवर का घेता अन् स्वत:चे उपाशी ठेवता, असे म्हणत अंधारे यांनी भाजपला टोला लगावला.ऊठ दुपारी अन् घे सुपारी

दुपारी उठणाऱ्या सुपारीबाजांना आता शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. मात्र, समृद्धी महामार्गावर २७ लोकांचे जीव गेले. त्यांच्यावर सामूहिक अंत्यविधी होत असताना भाजप एक पक्ष फोडून शपथविधी करत होता. तेव्हा नैतिकतेच्या, महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे बोलणारे सुपारीबाज कुठे होते, असा खरमरीत सवालही अंधारे यांनी केला. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपाprime ministerपंतप्रधानShiv Senaशिवसेना