निगडी : मुलांनी निश्चय केला पाहिजे. दुसऱ्यासारखे मोठे होण्यापेक्षा स्वत: उंच व्हावे, आपली रेघ मोठी करावी. स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास बाळगावा, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांनी विद्यार्थ्यांना दिला. शिक्षकांनी विषयापुरते मर्यादित न राहता जीवनाचे धडे उलगडून सांगितले पाहिजे, तरच आदर्श समाज घडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निगडीतील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न महाविद्यालय आणि चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा महाविद्यालयातील दिशा सोशल फाउंडेशनच्या ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी ते बोलत होते. या वेळी शरद इनामदार, प्राचार्य गोकुळ कांबळे, डॉ. दीपक शहा, प्राचार्य राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या वनिता कुऱ्हाडे, दिशाचे अध्यक्ष गोरख भालेकर, समन्वयक नाना शिवले आदी उपस्थित होते.नाना शिवले यांनी प्रास्ताविक केले. वैशाली देशपांडे व वंदना पांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती वाघोलीकर यांनी आभार मानले. वनिता कुऱ्हाडे, सुमती पाटसकर, यांनी संयोजन केले.(वार्ताहर)
स्वप्न पूर्णत्वाचा ध्यास घ्यावा
By admin | Published: January 24, 2017 1:54 AM