तळवडे : येथील परिसरातून तळवडे सॉफ्टवेअर पार्क, तळवडे औद्योगिक वसाहत, चाकण औद्योगिक वसाहत, आंबी औद्योगिक वसाहत, या ठिकाणी शहर परिसरातील कामगार, तसेच संबंधित व्यावसायिक यांचा प्रवास सुरू असतो. मालवाहतूक करणारे टेम्पो, कंटेनर यांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. देहू, निघोजे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि देहू-आळंदी येथे दर्शनासाठी राज्यभरातून येणारे भाविक यांचाही प्रवास याच मार्गावरून होत असते. यामुळे मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ या मार्गावर असून, दररोज वाहतूककोंडी ठरलेली असते.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय होण्यापूर्वी तळवडे भाग देहूरोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत होता. या ठिकाणी नियमित वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त करणे शक्य नसल्याचे वरिष्ठ पातळीवरून सांगितले जात असे. मात्र आयुक्तालय झाल्यानंतरही तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकात सुरक्षारक्षक वाहतूक नियमन करीत आहेत, तर तळवडे गावठाण चौकात वाहतूक अजूनही रामभरोसे आहे.वाहनचालकांची मनमानीया ठिकाणी वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहन दामटत आहेत. सिग्नल सुरू असूनही चालक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक, मालवाहू वाहनांतून कामगारांची वाहतूक केली जाते; तसेच सर्रासपणे विरुद्ध दिशेने वाहने चालविली जात आहेत.४तळवडे येथील रस्त्यावर नेहमीच वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या असतात. येथील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि ग्रामस्थ त्रस्त आहेत. नवीन आयुक्तालय झाले असून, कोंडीतून सुटका करण्यासाठी नियमित वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.तळवडे येथील नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. या परिसरातील जोतिबानगर चौक, तळवडे गावठाण चौक, सॉफ्टवेअर चौक तीनही ठिकाणी सकाळी व सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने कामगार, विद्यार्थी त्रस्त आहेत. या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमावेत, यासाठी पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.- पंकज भालेकर, नगरसेवक, तळवडे