रावेत : घरातून कामासाठी बाहेर पडायची सर्वांची एकच वेळ आणि कार्यालयात वेळेवर पोहोचायची घाईगडबड... रस्ता ओलांडताना पादचाºयांची उडणारी तारांबळ... खासगी वाहनांच्या अतिक्रमणाला भेदत जाणा-या पीएमपी बस... वाहतूक पोलिसांची गैरहजेरी आणि नियोजनाचा अभाव यामुळे होणारी विस्कळीत वाहतूक... कधी वाहतूक ठप्प, तर कधी कासवगतीने पुढे पुढे सरकणारी... यामुळे बराचसा वेळ रस्त्यावरच काढावा लागत असल्याने वाढणारा मानसिक ताण... अशा स्थितीतून नागरिकांना रावेत, बिजलीनगर, निगडी प्राधिकरण रस्त्यावरून दररोजच तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो. रस्त्यावर व मुख्य चौकामध्ये वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांचा अभाव, बंद असलेले वाहतूक दिवे, वेगवान वाहतूक, खासगी व्यावसायिक, हातगाड्यांचा गराडा, नो-पार्किं ग व रस्त्यात उभी असलेली वाहने आदींमुळे परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमच ऐरणीवर येत आहे.निगडी-प्राधिकरणात नियमांचे सर्रास उल्लंघन४निगडी : बेशिस्त वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम कायमच धाब्यावर बसविण्यात येतात. झेब्रा क्रॉसिंगचा नियमच माहीत नसल्यासारखे काही उद्दाम वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करतात. मग पादचाºयांनी रस्ता ओलांडायचा कसा? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहे.४वाहतूक विभागाने घालून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली करणारे अनेक बेशिस्त वाहनचालक दररोज दिसतात. शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया निगडीत असे बेशिस्त वाहनचालक मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत निगडीतील भक्ती-शक्ती चौक व (कै.) मधुकर पवळे उड्डाण पूल वाहनांची वर्दळ असते.४परंतु बहुतांश वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या आतमध्ये आपले वाहन न थांबवता झेब्रा क्रॉसिंगवर अथवा पुढे आपली वाहने थांबवितात. यामुळे सध्या वाहन चालकांकडून झेब्रा क्रॉसिंग हा वाहतुकीचा नियम धाब्यावर बसविला जात आहे. झेब्रा क्रॉसिंग या वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कडक कारवाई करत नाहीत.नयमानुसार झेब्रा क्रॉसिंग ठिकाणी चालकांना थांबणे जरुरीचे असते़ मात्र अनेक वाहनचालक नियम धाब्यावर बसवून वाहने चालवत असतात अणि त्याचे परिवर्तन अपघातात होत असते. हे अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे.परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जात नसल्याचे वास्तव समोर येत आहे. बहुतांशी मुख्य चौकात वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. वाहनचालक मनमानी करत असल्याचे दिसत आहे. वाहतूक शाखेच्या अनियोजित कारभारामुळे अवैध वाहतूक जोमात सुरू आहे.रावेत बीआरटी चौक सकाळी ९़३०४किवळे औंध या मार्गावरील हा मुख्य चौक आहे़ या मार्गाचा वापर अनेक वाहने द्रुतगती मार्गाकडे, पुण्याच्या दिशेने, निगडीकडे जाण्यासाठी व येण्यासाठी करीत असतात़ त्यामुळे नेहमी वाहतुकीने गजबजलेल्या अवस्थेत असतो़ या मुख्य चौकात वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी दिसून आले नाहीत़ येथील नागरिकांनी सांगितले की, दररोज सकाळी व सायंकाळी येथे वाहतूककोंडी होत असते़रेल विहार चौक, बिजलीनगर सकाळी ९़४५ :४निगडीप्राधिकरण ते चिंचवड गाव या मार्गावरील हा मुख्य चौक असून, येथे नेहमी वाहतूक चालू असते़ पोलीस कर्मचाºयांचा अभाव पहावयास मिळाला़ वाहतूक नियंत्रण दिवे चालू असतानासुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत मध्येच वाहने घुसवण्याचा प्रयत्न करीत असलेले पहावयास मिळाले़ अधून मधून येथे वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी आढळून येतात़ मात्र रस्त्याच्याकडेला वाहनचालकांवर कारवाई करीत असतात आशा वेळी सोबत असणारा वार्डन वाहतुकीचे नियंत्रण करीत असतो़ परंतु त्याला न जुमानता अनेक वाहनचालक नियम मोडून निघून जातात.संभाजी चौक प्राधिकरण सकाळी १०़००४हा चौक नेहमी विद्यार्थी आणि नागरिकांनी गजबजलेला असतो़ त्यातच येथील निष्क्रिय वाहतूक नियंत्रण यंत्रणा कधी चालू तर कधी बँड अवस्थेत असते़ नेहमीप्रमाणे पोलीस कर्मचारी या चौकात पहावयास मिळाले नाहीत़ त्यामुळे वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहनचालक वाहन चालवित होते. वाहनचालकांवर कठोर कारवाईची गरज आहे.भेळ चौक प्राधिकरण सकाळी १०़०५४पालिकेच्या या प्रभाग समोरील हा मुख्यचौक असून, या चौकातून भक्ती शक्ती,मुबई-पुणे जुना मार्ग, प्राधिकरण आदीठिकाणी जा-ये करण्यासाठी नागरिक वापर करतात़ येथेच प्रभाग कार्यालय असल्याने कामानिमित्त येणाºया नागरिकांची, कर्मचाºयांची सतत वर्दळ असते़ वाहतूक विभागाचे कर्मचारी नसल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले पहावयास मिळाले़टिळक चौक निगडी सकाळी १०़१५४निगडी येथील हा मुख्य चौक असून, येथे काही शासकीय कार्यालये, हॉटेल्स, दवाखाने, इतर दुकाने, मुख्य बस थांबा असल्याने येथे सतत वाहतूक चालू असते़ येथे मात्र दोन वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित असलेले पहावयास मिळाले़ परंतु वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी एकमेकां सोबत गप्पा मारण्यात मशगुल होते याचा फायदा घेत अनेक वाहनचालक वाहतूक नियंत्रण दिवे तोडून वाहने दामटीत असतानाचे चित्र होते. तसेच या ठिकाणी अल्पवयीन वाहनचालकांची संख्याही जादा आहे. त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.वॉर्डन करतात वाहनाची तपासणी४रहाटणी : सध्या शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने त्याचा ताण वाहतूक पोलिसांवर येत आहे़ हा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्राफिक वार्डन काही वर्षापासून दिले आहेत. मात्र सध्या ट्राफिक वार्डनचा उपयोग वाहतुकीपेक्षा इतर कामांसाठी होत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.४सिग्नलवर उभे असलेल्या वाहनचालकांचा परवाना तपासणे, पीयूसी तपासणे, वेळप्रसंगी दंड आकाराने इतकी कामे सर्रास ट्राफिक वॉर्डन करताना दिसून येत आहेत. मात्र, या सर्व प्रकारात रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील चौकात होणाºया वाहतूककोंडीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. मागील काही दिवसांपासून कोकणे चौक, शिवार चौक, गोविंद यशदा चौक, स्वराज गार्डन चौक, रहाटणी फाटा व काळेवाडी फाटा या ठिकाणी सिग्नलला उभा राहिलेल्या वाहनचालकांना बाजूला घेऊन तपासणी करत आहेत.४ज्या कर्मचाºयांची नेमणूक या चौकात नव्हती असे कर्मचारी या ठिकाणी वाहने अडवून दंड आकारीत असल्याचे दिसून आले. एक महिला वाहतूक पोलीस व एक वॉर्डन हे दोन कर्मचारी नो पार्किं गमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना जॅमर लावणे, दंड आकाराने ही जबाबदारी त्यांच्यावर होती़ मात्र हे कर्मचारी शिवार चौक, गोविंद यशदा चौकात वाहने आडवून दंड वसूल करीत होते. मागील काही दिवसांपासून साई चौकात ग्रेड सेप्रेटर व उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने काळेवाडी फाट्याकडून औंधकडे जाणारी वाहतूक साई चौकातून शिवार चौक मार्गे औंधकडे वळविण्यात आली असल्याने शिवार चौकात सकाळ सायंकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या चौकात वहातूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वाहने आडविन्यावर भर देत असल्याचे दिसून येते.हिंजवडीत योग्य नियोजन४१२ वाजून २० मिनिटे हिंजवडीतील शिवाजी चौकात पोहोचलो असता दोन चौकांत दोन पोलीस कर्मचारी आणि दोन वार्डन वाहतूक नियमन करीत होते़ काही वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे आल्याचे दिसले़ मात्र सिग्नलद्वारे वाहतूक नियमन व्यवस्थितपणे सुरू होते. दुपारी एकच्या सुमारास पुन्हा भूमकर चौक येथे परिसरातील शाळा सुटल्याने चौकाच्या दोन्ही बाजूस वाहतूक पोलीस आणि कर्मचारी नियमन करताना दिसले़ या वेळी चौकात प्रचंड गर्दी होती़ मात्र चारही बाजूंना पोलीस असल्याने वाहतूक सुरळीत सुरू होती.थेरगाव परिसरामध्ये पादचाºयांची होतेय कुचंबणा१थेरगाव : डांगे चौक येथे वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात असून, नियम तोडणाºयांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. सिग्नलवर पादचाºयांची कुचंबणा होताना दिसत आहे. सिग्नलला वाहने झेब्रा क्रॉसिंगलाच उभी केली जात असल्याने पादचाºयांना रस्ता ओलांडण्यात अनेक अडचणी येत आहेत.२या गजबजीच्या रस्त्यांवर नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, काही काळाने परिस्थिती ह्यजैसे थेह्णच होते.वाहनचालक कसलीही पर्वा न करता सर्रास जीव धोक्यात घालून आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवितात.३वाहतूक नियमांबाबत नेहमीच जनजागृती केली जाते़ मात्र वाढती वाहनसंख्या व रस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. काही वाहनचालक नियम मोडण्यासाठीच असतात, अशा अविभार्वात दुचाकी तसेच चारचाकी वाहने दामटवतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडण्याचे तसेच गंभीर स्वरूपाच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
वाहनचालकांची मनमानी, वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त; वारंवार होताहेत अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 2:46 AM