शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला; मित्रांनी आरडाओरडा केला तोपर्यंत वेळ निघून गेली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 7:04 PM

पोहण्यासाठी तळ्याच्या पाण्यात उतरू नये, आपला जीव महत्त्वाचा असून घरी कोणीतरी वाट पाहतंय याची जाणीव ठेवावी

तळेगाव दाभाडे: पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तळ्यातील पाण्यात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला.  ही दुर्घटना गुरुवारी(दि.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.अनिकेत घन:श्याम तिवारी(वय १८, सद्या रा. मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे, मूळ रा. अभनपूर - रायपूर, छत्तीसगढ) असे मृताचे नाव आहे. तो तळेगाव दाभाडे जवळील आंबी येथील डी. वाय. कॉलेजमध्ये आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्गात शिकत होता. तो गुणी व हुशार होता.

घटनेची माहिती समजतात वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम हाती घेतली. मात्र अंधार पडल्याने गुरुवारी रात्री ७.३०च्या सुमारास ही शोध मोहीम थांबविण्यात आली. शुक्रवारी(दि .२४)सकाळी ६.३०च्या सुमारास  शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. 

सुमारे सव्वा तासाच्या अथक प्रयत्नानंतर ७.४५च्या सुमारास अनिकेतचा मृतदेह  पाण्याबाहेर काढण्यात शोध पथकास यश आले. मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत आणि त्याचे तीन चार मित्र तळ्याकाठी फिरण्यासाठी गेले होते. त्यातील काहींना पाण्यात उतरण्याचा मोह झाला. अनिकेतला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.  उन्मेश गुट्टे यांनी शिवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

तळ्यातील पाणी खोल आहे. पर्यटकांनी आतताईपणा करू नये. पोहण्यासाठी तळ्याच्या पाण्यात उतरू नये. यापूर्वीही या ठिकाणी काहींना आपला अनमोल जीव गमवावा लागला आहे. आपला जीव महत्त्वाचा आहे. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे याची जाणीव ठेवावी. असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसWaterपाणीStudentविद्यार्थीDeathमृत्यूHealthआरोग्य