पिंपरी: गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक लाख ३० हजार ५५ रुपये किमतीचा चार किलो ६०३ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने भोसरी येथे शनिवारी (दि. ५) ही कारवाई केली.
माणकाबाई शहाजी वाघमारे (वय ६५, रा. आंबेडकर नगर झोपडपट्टी, भोसरी), मामू ऊर्फ रउफ खान रमजान खान (वय ८३, रा. विठ्ठल नगर झोपडपट्टी, भोसरी), सावित्रीबाई युवराज गायकवाड (वय ७०, रा. बालाजीनगर झोपडपट्टी भोसरी), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप छबु शेलार यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे विक्री करण्यासाठी गांजा बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. भोसरीतील लांडेवाडी येथील आंबेडकर नगर झोपडपट्टी व विठ्ठल नगर झोपडपट्टी तसेच एमआयडीसी येथील बालाजी नगर झोपडपट्टी येथील सापळा रचून छापा मारला. या कारवाईत एक लाख ३० हजार ५५ रुपये किमतीचा चार किलो ६०३ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ अधिक तपास करीत आहेत.