पिंपरी : औद्योगिकनगरीची तहान भागविणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे आत्तापासूनच पाणीकपात करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. धरणातील साठा आणि शहराची गरज पाहता आतापासूनच टप्प्याटप्प्याने पाणीकपात गरजेची आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.शहराला पाणी पुरविणाºया पवना धरणात ६० टक्के पाणीसाठा असून, तो गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे. तो १५ जूनपर्यंतच पुरू शकणार आहे. धरणातून दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे.>१५ जूनपर्यंत पुरेल इतकाच साठाधरणात १० टक्के पाणीसाठा कमी आहे. तो १५ जूनपर्यंत पुरेल एवढाच आहे. चार आॅक्टोबरला कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत महापालिकेला पाणीकपात करण्याचे निर्देश दिले होते. आतापासूनच पाणीकपात करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात जास्त पाणीकपात करुन पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे, असे पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गडवाल यांनी सांगितले.>पवना धरणात पाणीसाठा सीमित आहे. त्यामुळे आतापासूनच टप्प्याटप्प्याने पाणीकपात करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होईल. धरणातील साठा आणि एकंदर गरज पाहता आतापासूनच पाणीकपात करावी लागणार आहे अन्यथा भविष्यात जास्त पाणीकपात करावी लागेल. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले आहे. गटनेत्यांची बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल.श्रावण हर्डीकर, आयुक्त
पवनेतील साठा कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने होणार पाणीकपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 1:55 AM