शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

खंडित वीजपुरवठ्याचा देहूकरांना त्रास कायम

By admin | Published: June 04, 2016 12:14 AM

राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या देहूगाव व परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर कायमचा तोडगा काढावा यासाठी देवी इंद्रायणी येथील स्विचिंग

देहूगाव : राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या देहूगाव व परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर कायमचा तोडगा काढावा यासाठी देवी इंद्रायणी येथील स्विचिंग स्टेशन तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. १७ मे रोजी आठ दिवसांत हे स्विचिंग स्टेशन सुरू करण्याचे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश गुजर यांनी दिले होते. मात्र, हे स्टेशन सुरू झालेले नाही.देहूगाव परिसराला सध्या टेल्को फीडरवरून विद्युतपुरवठा केला जात आहे. पिंपरी-चिंचवड भागात काही कामे सुरू असल्यास या भागातील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होतो. सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे हैराण ग्रामस्थांनी सरपंच हेमा मोरे, उपसरपंच सचिन साळुंके, ग्रामपंचायत सदस्यांसह महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. या वेळी गुजर यांनी आश्वासन दिले होते. गुजर म्हणाले, की स्विचिंग सेंटरमधील आर्थिंग कामातील दोष काढला असून, तपासणीही झाली आहे. मात्र, परिसरासाठी लागणारा विद्युतभार उपकेंद्रातून उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठीचा पत्रव्यवहारही केला असून, तीन-चार दिवसांत ही परवानगी आल्यानंतर विद्युतपुरवठा करण्यासाठी टेल्को उपकेंद्रात अंतर्गत बदल करून या फीडरला विद्युत भार घेण्याचे काम बाकी आहे. हे काम झाल्यानंतर देहूला तातडीने विद्युतपुरवठा सुरू करू. (वार्ताहर)