- देवराम भेगडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककिवळे : महाशिवरात्री यात्रेनिमित्त सोमवारी (दि. ४) देहूरोड -शेलारवाडीजवळ असणाऱ्या श्रीक्षेत्र घोरवडेश्वर डोंगरावरील शिवलिंगाचे लाखो भाविक दर्शन घेणार आहेत. डोंगर रस्त्यावरील झालेली पायऱ्यांची दुरवस्था, विविध ठिकाणी माती-मुरुमाचा भराव वाहून गेल्याने येथील दर्शन मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होणार आहे. दर्शन रांगेसाठी संरक्षक लोखंडी कठड्यांची दुरवस्था झाली असल्याने अपघाताची शक्यता आहे.महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र घोरवडेश्वर डोंगरावर यात्रेचे आयोजन करण्यात येते. यात्रा काळात डोंगरावरील शिवलिंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. मात्र डोंगरावरील दर्शन मार्गाची दुरवस्था झाल्याने गर्दीच्या वेळी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दर्शनमार्गातील समस्या व भाविकांच्या गैरसोई दूर करण्याबाबत उदासीनता आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक व भाविक करीत आहेत.
दुसºया टप्प्यातील पायºया संपल्यानंतर शेवटच्या टप्प्यातील मार्गातील मातीमुरुमाचा भराव पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. उघड्या पडलेल्या दगड गोट्यांतून भाविकांना मार्ग काढावा लागत आहे.
रविवारपासून पोलीस बंदोबस्ताची मागणीमहाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा डोंगरावर जाणाºया भाविकांची संख्या दर वर्षी अधिक असते. मात्र त्या वेळी डोंगरावर पोलीस बंदोबस्त नसल्याने दर्शनाच्या वेळी चेंगराचेंगरी होते. अभिषेक, पूजा व आरती झाल्याशिवाय भाविक परत फिरत नसल्याने त्या ठिकाणी मोठी गर्दी होते. मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणीही स्वयंसेवक अगर पोलीस उपस्थित नसतात. त्यामुळे चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पोलिसांनी रविवारी रात्रीपासून पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका, आरोग्य विभागाचे अधिकारी व वैद्यकीय पथक घोरवडेश्वर डोंगर व पायथ्याला सज्ज ठेवावेत, अशी मागणी होत आहे.श्रीक्षेत्र घोरवडेश्वर डोंगरावर दर वर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. सुमारे दोन-अडीच लाखांहून अधिक भाविक शिवलिंगाच्या दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिन्यात सोमवारसह संपूर्ण महिनाभर गर्दी होत असते. तसेच वर्षभर दर सोमवारी व नियमित दर्शनासाठी जाणाºया भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र डोंगरावर जाणाºया भाविकांना विविध समस्यांना व गैरसोईचा सामना करावा लागत आहे. डोंगराच्या पहिल्या टप्प्यापर्यंतच्या पायºया घडीव दगडाच्या असून, दुसºया टप्प्यात असणाºया ओबडधोबड पायºया जीर्ण झाल्याने काही ठिकाणी निघाल्या आहेत. त्या ठिकाणी पायी मार्ग अरुंद झाला आहे. यात्रा काळात त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन दरीच्या बाजूला अपघात होण्याची शक्यता आहे.४पठारावर दरीच्या बाजूने लोखंडी रेलिंग नसल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्य शिवलिंग, तसेच विठ्ठल-रखुमाई व संत तुकाराममहाराज महाराजांच्या दर्शनासाठी उभारण्यात आलेल्या दर्शनबारीलगत दरीच्या बाजूने उभारलेल्या लोखंडी कठड्यांची दुरवस्था झालेली आहे. कठडे हलत असून, काही ठिकाणी डोंगराच्या व काही ठिकाणी दरीच्या बाजूला झुकले आहेत. कठडे जीर्ण झाल्याने गर्दीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. दर्शनबारी, डोंगर मार्गावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे.४डोंगरावर यात्रेच्या वेळी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असताना मोठी दुर्घटना होण्याची संबंधित विभाग वाट पाहत आहे का, असा प्रश्न स्थानिक नागरिक व भाविकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. डोंगरावर पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत पाणीपुरवठा करण्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नियमित डोंगरावर जाणारे भाविकही त्रस्त आहेत.भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.