शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

उद्योगनगरीला फ्लेक्समुळे बकालपणा, शहराच्या सौंदर्यीकरणास बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 2:10 AM

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून महापालिका प्रशासनाकडून वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र याचा खरेच फायदा होतो काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

रहाटणी - पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून महापालिका प्रशासनाकडून वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र याचा खरेच फायदा होतो काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत फ्लेक्स लावू नये व शहर विद्रूप करू नये असे न्यायालयाचे आदेश असताना, सर्वच नियम धाब्यावर बसवून राजकीय पदाधिकारी शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिरात फ्लेक्स लावत आहेत.अनधिकृत फ्लेक्सकडे महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाचे दुर्लक्ष आहे. जाहिरात फलकाचा सांगाडा कोसळून पुणे शहरात चार जणांचा मृत्यू झाला. पिंपरी- चिंचवड महापालिका यातून बोध घेताना दिसून येत नाही. दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करीत आहेत. त्यासाठी फ्लेक्सचा वापर करण्यात येत आहे.राजकीय पदाधिकारीही नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी फ्लेक्सचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र फ्लेक्स उभारल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत असून, बकालपणा वाढत आहे.रहाटणी, काळेवाडीत तर दीपावलीच्या शुभेच्छा फलक व बांधकाम व्यावसायिक यांच्या जाहिरातीच्या फ्लेक्सने कहर केला आहे. एका विद्युत खांबावर अनेक जाहिरात फ्लेक्स दिसून येत आहेत. काही ठिकाणच्या वळणावर तर वाहनचालकांना वळणावरून येणारे वाहनही दिसून येत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी अगदी रस्त्यावर फलक लावले आहेत. मात्र शासनाच्या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचा संबंधित विभाग दुर्लक्ष का करीत आहे, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, वाकड, थेरगाव, पिंपरी गावठाण, पिंपळे गुरव, सांगवी यासह शहरातील अनेक परिसरात असे अनधिकृत फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.जागा खरेदी- विक्री करणारे व्यावसायिकही मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करीत आहेत. शहरातील बड्या नेत्यांच्या आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे निकटवर्तीय असल्याचे या व्यावसायिकांकडून सांगण्यात येते. त्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायासंबंधीचे फलक मुख्य रस्ते, चौक आणि गल्लीबोळातही लावल्याचे दिसून येत आहेत. असे फलक बहुतांश अनधिकृत आहेत. असे असले, तरी आपले कोण काय करणार, असा या व्यावसायिकांचा आविर्भाव असतो. त्यामुळे जागा विक्री-खरेदीचे फ्लेक्स आणि छोटे फलक शहरभर लावण्यात आल्याचे दिसून येते. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.नवीन वर्षाचे शुभेच्छाफलक झळकलेकाही मुरब्बी राजकारण्यांचे नवीन वर्षाचे शुभेच्छा फलक आतापासूनच लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चौकांचा बकालपणा वाढत आहे. प्रभागातील कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याचा वाढदिवस असला, तरी विविध निवडणुकांसाठीचे इच्छुक उमेदवार आणि राजकीय पदाधिकारी त्यास वाढदिवस शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावत असल्याचे दिसून येते.महापालिकेच्या अधिकाºयांवर दबाव?रहाटणी चौक, नखाते वस्ती चौक, कोकणे चौक, शिवार चौक, तापकीरनगर, रहाटणी फाटा यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले जात आहेत. याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. या चौकातील फ्लेक्सवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. रहाटणी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या परिसरातही मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहे. त्यामुळे या पुतळा परिसराच्या सौंदर्यास बाधा पोहचत आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचे पुतळा स्मारक या फ्लेक्समुळे झाकोळले आहे. अशा फ्लेक्सवर आणि जाहिरातबाजांवर कारवाई करण्याबाबत अधिकारी का धजावत नाहीत, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.अद्यापही दिसून येतात दस-याचे फलकनखाते वस्ती चौकात एकावर एक फ्लेक्स लावण्याची स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येते. परिसरातील अनेक कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही फ्लेक्सने मोठी जागा व्यापली आहे. विद्युत खांबांना, तसेच पथदिव्यांच्या खांबांनाही छोटे जाहिरातफलक लावण्यात येत आहेत. रहाटणी, काळेवाडी परिसरात नवरात्री आणि दसºयाच्या शुभेच्छांचे फलक अद्यापही दिसून येत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड