पिंपळे गुरव : मिरवणुकीवर होणारा खर्च टाळून योगेश जगताप यूथ फाउंडेशन व बालाजी महिला मित्र मंडळ यांच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ११ हजार १११ रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे मुख्यमंत्री दुष्काळनिधीसाठी धनादेश सुपूर्त करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश जगताप व बालाजी मित्र मंडळाच्या प्रियंका जगताप यांच्या पुढाकारातून ही मदत करण्यात आली. अशा परिस्थितीत मानवतेच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मदत करणे कर्तव्य आहे. त्यामुळे परिसरातील अनेक मंडळाने हा आदर्श घ्यावा. रुपेश देवधर, अविनाश डिमॅटी, सरिता पाटील, अजित आल्हाट उपस्थित होते. (वा.प्र.)
दुष्काळग्रस्तांना मदत करून घडवले माणुसकीचे दर्शन
By admin | Published: October 19, 2015 1:47 AM