लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : इयत्ता १२ वीचा निकाल मंगळवारी दुपारी लागला. या निकालाची उत्कंठा विद्यार्थ्यांसह पालकांनाही लागली होती. आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील विविध कॅफे, शाळांमध्ये गर्दी पहायला मिळाली. मिळवलेले मार्क पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वहात होता. अनेक शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. तर काही शाळांमध्ये मुलींनी बाजी मारल्याचे चित्र पहायला मिळाले. एकूणच यंदाच्या निकालांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे.शिवभूमी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्केयमुनानगर निगडी येथील शिवभूमी कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्त १२वी चा निकाल सलग चौथ्या वर्षी १०० टक्के लागला आहे़ विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून सुप्रिया अडसूळ (८३़३८ टक्के), अदित्य पवळे (८२़७७ टक्के), कुणाल नांदुरकर (८०़४६ टक्के), या विद्यार्थ्यांनी वर्गात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे़ वाणिज्य शाखेचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून दीपाली इंगळे (८३़६९ टक्के), पूजा साबळे (७८़३० टक्के), शुभदा डोळस (७८़१५ टक्के) या विद्यार्थ्यांनी वर्गात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला़ कला शाखेचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून रिया बनसोडे (७८़१५ टक्के), मनीषा आढाव (६५़६९ टक्के), पूजा वाघमारे (६५़३८ टक्के) या विद्यार्थ्यांनी वर्गात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे़ विद्यालयाचे प्राचार्य भगवान शिंगाडे व संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिवाजीराव कोंडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले़सौ. अनुसया वाढोकार विज्ञान शाखेचा १००% निकालतळवडे : रुपीनगर येथील रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ. अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल ९६.१७ टक्के लागला असून यात अनुक्रमे विज्ञान शाखा १०० टक्के, वाणिज्य शाखा ९७.८७ टक्के तसेच कला शाखा ८५.११ टक्के निकाल लागला असून, महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत भसे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.विज्ञान शाखेतील शेवाळे अंकित सुभाष याने शेकडा ८५.८५ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला, खेमनर प्रशांत बाबासाहेब याने शेकडो ८२ गुण मिळवून द्वितीय तर मोरे ब्रम्हा मधूकर याने शेकडा ८०.७७ गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला आहे. वाणिज्य शाखेतून खान मुस्कान कट्यूम हिने ८४.३१ टक्के गुण मिळवत प्रथम तर शिंदे शीतल संजय ८१.८५ टक्के तर उबाळे रोहिणी सिमोन हिने ८०.४५ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. विज्ञान शाखेत मुलांनी तर वाणिज्य शाखेत मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे.कला शाखेत तेवलेकर पूजा संभाजी हिने शेकडा ७३.२३ गुण मिळवून प्रथम क्रमांक, मोरे संदेश अंकुश याने शेकडा ७१.३८ द्वितीय तसेच खान इम्रानबी फिरोज हिने शेकडा ६६.३० गुण मिळवून शाखेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. कै़ ना. मा. गडसिंग गुरुजी ज्युनि. कॉलेज, कृष्णानगरचिखली : कृष्णानगर येथील कै. मा. ना. गडसिंग गुरुजी ज्युनिअर कॉलेजचा शेकडा निकाल ९६.४२ लागला असून कला शाखेचा निकाल ८८. ८८ % लागला. कला शाखेत अश्विनी बोडखे हिने शेकडा ७९.८४ गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला.वाणिज्य शाखेचा शेकडा निकाल ९८.५९ लागला असून तळेगावे शिल्पा ८३.३८ % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. विज्ञान शाखेचा निकाल १०० % लागला असून आत्तार रियाज याने शेकडा ८५.८५ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण मोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मावळातही जल्लोषकामशेत : येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पंडित नेहरू माध्यमिक व श्री. आनंदरामजी पन्नालालजी भटेवरा उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या वाणिज्य, कला व व्यवसाय विभागात मिळून एकूण ३२५ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यातील २९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा बारावीचा निकाल ९१.६९ % टक्के लागला आहे, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. घुले यांनी दिली. निकाल पाहण्यासाठी व त्याची प्रत मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कामशेत शहरातील सायबर कॅफेत गर्दी केली होती. अनेक जणांनी मोबाईलवर निकाल पाहिला. सायबर कॅफेत पालकांचीही गर्दी दिसत होती. विद्यार्थी उत्सुकतेने निकाल पाहण्यात दंग होते. शहरात ठिकठिकाणी बारावीच्या निकालाच्या चर्चा रंगल्या होत्या. पंडित नेहरू विद्यालयाच्या निकालात मागील वर्षीपेक्षा प्रगती झाली आहे. वाणिज्य शाखेतून १५३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील १५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या शाखेचा निकाल ९९.३४ टक्के लागला आहे. कला शाखेतून १०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या शाखेचा निकाल ८३.३३ टक्के लागला आहे. व्यवसाय विभागातून ७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ८७.१४ टक्के लागला आहे.विद्यालयाचे प्रथम तीन क्रमांक : गुण आणि टक्केवारी : वाणिज्य शाखा : १) पल्लवी पांडुरंग शेटे ५४५ (८३.८४ टक्के)़, २) पूजा रघुनाथ मोरमारे ५३८ (८२.७६), ३) पूजा राजेंद्र लालगुडे ५३० (८१.५३). कला शाखा : १) प्रतीक्षा गबळू गायकवाड ५०० (७६.९२ टक्के), २) स्वाती बजरंग काजळे ४८४ (७४.४६), ३) सुनीता अरुण ओव्हाळ ४६२ (७१.०७). व्यवसाय शाखा : १) रूपेश कैलास दहिभाते ४६२ (७१.७ टक्के), २) भाग्यश्री बाळासाहेब काजळे ४४८ (६८.९२), ३) जगन्नाथ दयाराम उकरंडे ४३६ (६७.०७)‘आनंदऋषिजी’ महाविद्यालयाचा ९८ टक्के निकाल देहूरोड : मामुर्डी ( देहूरोड ) येथील देहूरोड लायन्स क्लब संचालित आनंद ऋषीजी महाराज ज्युनिअर कॉलेजचा (कॉमर्स) बारावी परिक्षेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. पहिले तीन क्रमांक अनुक्रमे साबा पठाण (८८.४६ टक्के), शमीला खान (८१.८४) टक्के आणि रुकसार शेख (८०.७६ टक्के ) यांनी मिळविले.आॅनलाईन बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदाने जल्लोष केला. मिठाईच्या दुकानात पेढे खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९० टक्केशिरगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा मावळ तालुक्याचा एकूण निकाल ९०.०७ टक्के लागला आहे. तालुक्यातून ३४०८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ३४०४ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले होते. यामधून ३०६६ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. १०१ विद्यार्थी डीस्टिंगक्शनमध्ये, १६९५ विद्यार्थी ग्रेड एक, १०४७ विद्यार्थी ग्रेड दोन, तर २२३ विद्यार्थी पास ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले. मावळ तालुक्यातील गुणवत्ता वाढली असल्याचेच या निकालातून स्पष्ट होत आहे. तालुक्यात २७ ज्युनिअर कॉलेज असून या कॉलेजांपैकी सहा कॉलेजच्या सर्व शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. इतर कॉलेजमधून ७ वाणिज्य शाखा, ५ विज्ञान शाखा व २ कला शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व शाखांचा १०० टक्के निकाल : १) डॉन बास्को ज्युनिअर कॉलेज लोणावळा, २) एस मंडळ ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडे, ३) जैन ज्युनिअर कॉलेज कामशेत ४) आॅल सेन्ट चर्च ज्युनिअर कॉलेज लोणावळा, ५) जैन ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडे, ६) एच बी़ पी़ एऩ काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखा : १) डॉन बास्को ज्युनिअर कॉलेज लोणावळा, २) न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज वडगाव मावळ ३) एस़ मंडळ ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडे, ४) जैन ज्युनिअर कॉलेज कामशेत ५) जैन ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडे,वाणिज्य शाखा : १) डॉन बास्को ज्युनिअर कॉलेज लोणावळा, २) न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज वडगाव ३) एस मंडळ ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडे, ४) आदर्श ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडे, ५) आॅल सेन्ट चर्च ज्युनिअर कॉलेज लोणावळा, ६) ज्युनिअर कॉलेज भोयरे, ७) एच बी पी एन काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज या कॉलेज मधील वाणिज्य शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला शाखा : १) १)डॉन बास्को ज्युनिअर कॉलेज लोणावळा, २)आॅल सेन्ट चर्च ज्युनिअर कॉलेज लोणावळा.लोणावळा शहराचा बारावीचा निकाल ८४ टक्केलोणावळा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा लोणावळा शहराचा निकाल ८३.९३ टक्के लागला आहे. शहरातील चार कॉलेजमधून ११९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.डॉन बॉस्को व आॅल सेंट चर्च या दोन कॉलेजांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्याखालोखाल डी.पी.मेहता ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९२.२४ टक्के व सर्वाधिक कमी निकाल लोणावळा कनिष्ठ महाविद्यालयाचा ४२.२२ टक्के लागला आहे.डॉन बॉस्को कॉजेलमधून १६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व जण उत्तीर्ण झाले. आॅल सेंट कॉलेजमधून अवघ्या चार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले. डी. पी. मेहता कॉलेजमधून ७९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ पैकी ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लोणावळा महाविद्यालयातून २२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आदर्श कॉलेज : वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के तळेगाव दाभाडे : येथील आदर्श ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून, विज्ञान शाखेचा निकाल ९८.१४ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे दोन्ही शाखांमध्ये पहिले तीन क्रमांक मिळवून मुलींनी बाजी मारली आहे. वाणिज्य शाखेत तृप्ती संभाजी बुटे ही विद्यार्थिनी ८६.९२ टक्के (५६५) गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. द्वितीय क्रमांक काजल राजाराम मुऱ्हे (८२.९२ टक्के), तर तृतीय क्रमांक विजयलक्ष्मी त्रिभुवन जैस्वार (८२.७७) यांनी पटकावला. विज्ञान शाखेत विद्यालयात प्रथम क्रमांक भाग्यश्री हरिराम वाघ (८०.६१), द्वितीय क्रमांक ऐश्वर्या प्रवीण मुऱ्हे (७६.४६) तर तृतीय क्रमांक उमा गोरख भोते (७३.६९ ) यांचा आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णकांत वाढोकर, सचिव डॉ. दत्तात्रय बाळसराफ, उपाध्यक्ष यादवेंद्र खळदे, प्राचार्य संजय देवकर यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.कार्ला येथे निकाल पाहण्याची मोफत व्यवस्थाकार्ला : येथे युवा सेनेच्या वतीने कार्ला परिसरातील १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निकाल पाहण्याची व निकालाची प्रत मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. युवा सेनेच्या वतीने युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे आणि सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. दर वर्षी कार्ला परिसरातील विद्यार्थ्यांना लोणावळा किंवा कामशेत येथे निकाल पाहण्यासाठी व निकालाची प्रत काढण्यासाठी जावे लागते. विद्यार्थ्यांची ही गैरसोय ओळखून युवा सेनेने ही व्यवस्था केली. विद्यार्थ्यांचा गौैरवजाधववाडी : जाधववाडीतील कै. सुरेश मोरे महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला. महाविद्यालयाचे संस्थापक किरण मोरे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्रद्धा सोनावणे (८६.१५ टक्के) काजल बंदावणे (८०.६१ टक्के), सोनाली मळेकर (७९.२३ टक्के) यांनी उत्तम यश संपादन केले. यंदाही या शाळेच्या निकालात मुलींची सरशी झाली आहे.
बारावीच्या निकालाने विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
By admin | Published: May 31, 2017 2:23 AM