सुषमा नेहरकर-शिंदे/ लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राडारोडा आणि कचऱ्यामुळे मुठा नदीचे पात्र संकूचित झाले असून धरणांतून पाणी सोडल्यास शहराला पुराचा मोठा धोका होण्याची भीती निर्माण झाली. ट्रकच्या ट्रक राडारोडा टाकला जात असल्यानेही महापालिकेचे दूर्लक्ष आहे. या सपाट झालेल्या जागेवर झोपडपट्या वसायला लागल्या असून काही ठिकाणी तर त्यावर व्यवसायही थाटले आहे. ‘लोकमत’ने मुठा नदीच्या पात्राच्या केलेल्या पाहणीत हा धक्कादायक प्रकार दिसून आला आहे. दगड, माती, विटाचा राडा-रोडा व कच-यांचे प्रचंड ढिगारे टाकून मुठा नदीच्या पात्रावर सध्या सर्रास अतिक्रम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रामुख्याने उपनगर व ग्रामीण हद्दीत तर मुठा नदीचे पात्र म्हणजे कच-याचे आगार बनले आहेत. पुणे शहराचे वैभव समजल्या जाणा-या मुठा नदीची गटारगंगा झाली आहे. कधी काळी खळखळ वाहणारी मुठा नदी पात्र बांधकामाचा राडारोडा, रस्त्यावरील डांबर, सिमेंटरे ब्लॉक, मातीच्या प्रचंड ढिगा-याखाली गाडून गेले आहे. याशिवाय नदी पात्रात राजरोज टाकला जाणारा कचरा, प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या आणि कोणत्याही स्वरुपाची प्रक्रिया न करता सोडलेले सांडपाणी यामुळे मुठेचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भयानक वस्तूस्थीत समोर आली आहे. पत्राशेड टाकून अतिक्रमण1गेल्या काही दिवसांत मुठा नदीच्या पात्रात टप्प्या-टप्प्याने राडारोडाचा भराव टाकून सपाटीकरण केले जात आहे. शिवणे, वारजे, उत्तमनगर, कर्वेनगर, बंडगार्डन परिसारता ट्रकच्या ट्रक भराव व राडारोडा टाकून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर या जागेचा वापर झोपटपट्टी, लहान-मोठे हॉटेल व अन्य व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जात आहे. यासाठी काही प्रमाणात पत्र्याचे शेड टाकून बांधकामे देखील करण्यात आली आहेत. तर काही परिसरामध्ये अशा जागा निर्माण करून चक्क भाडेतत्वावर ही जागा दिली जात असल्याचे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले. 2राडारोडा टाकून नदी पात्र अरुंद केल्याने मोठा पाऊस झाल्यास नदीतून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन काही परिसरात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु या सर्व गोष्टींकडे महापालिका प्रशासन व स्थानिक संस्थाकडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शिवणे परिसरात राडारोड टाकला जात असल्याची तक्रार करून देखील यंत्रणेकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले.
राडारोडा कचऱ्यामुळे मुठा नदीचे अस्तित्वच आले धोक्यात
By admin | Published: July 05, 2017 3:07 AM