शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

बांधकाम विभागाचे घटणार उत्पन्न, अवैध बांधकामे रोखण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:27 AM

पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे कारण देऊन स्थायी समिती सभेने चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी नवीन बांधकामांना बंदी हा ठराव संमत केला.

पिंपरी : पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे कारण देऊन स्थायी समिती सभेने चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी नवीन बांधकामांना बंदी हा ठराव संमत केला. एकीकडे सत्ताधारी भाजपा बचतीचे धोरण अवलंबित असताना दुसरीकडे महापालिका उत्पन्नाला फटका बसेल असे निर्णय घेत आहे. पाणी बाणीने बांधकाम विभागाचे उत्पन्न घटणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत मिळकतकर आणि बांधकाम परवाना यातून मोठ्याप्रमाणावर उत्पन्न मिळते. पाणी, मिळकत आणि बांधकाम परवाना विभागातून सुमारे १२०० कोटी उत्पन्न मिळते. या वर्षी बांधकाम परवानगीतून महापालिकेला ५०० कोटी उत्पन्न मिळत आहे.नागरीकरण वाढल्याने औद्योगिकनगरीचा विकास झालेला आहे. गावांचे महानगर झाले आहे. भोसरी, चिंचवड आणि पिंपरीतील औद्योगिक वसाहतींमुळे रहिवासीकरण वाढले आहे. कर्मिशयल कॉम्प्लेक्स, तीन आणि चार तारांकित नामांकित हॉटेलची भर पडू लागली आहे. बांधकाम विभागातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १ हजार ७०० हजारांहून अधिक बांधकामांना महापालिकेने परवानगी दिली. त्यातून बांधकाम परवाना विभागाला चारशे कोटींचा महसूल मिळाला. राज्य सरकारने रेरा हा नवीन कायदा लागू केला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी अधिकाधिक बांधकामांना मंजुरी देण्यात आली.भोसरीतही हवी बंदीभोसरी, चिंचवड आणि पिंपरी अशा तीनही विधानसभांमध्ये बांधकामांचे प्रमाण मोठे आहे. चिंचवड आणि भोसरीत बांधकामाचेप्रमाण मोठे आहे. नवीन गावांत हे प्रमाण अधिक आहे. राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत नवीन बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. वाकड भागात गेल्या सात वर्षांत सर्वाधिक ९०१ गृहप्रकल्प व अन्य बांधकामांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याखालोखाल रहाटणी, काळेवाडी भागात ४१६ बांधकामांना परवानगी दिली आहे. चिंचवडमधील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे आदी भागामध्ये लोकसंख्या वाढत आहे. तसेच चºहोली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, दिघी, तळवडे या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. पाण्यामुळे बंदी घातली जात असेल तर भोसरीतही बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.>पावसाळ्यात बांधकामांना बंदीगृहप्रकल्पांमुळे नागरी समस्यांमध्ये भर पडत आहे. विशेषत: मूलभूत सुविधांवर ताण येत असल्याचा भाजपा लोकप्रतिनिधींचा दावा आहे. यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठ्या गृहप्रकल्पांना यापुढील काही काळ बांधकाम परवाना देण्यात येऊ नये, असा निर्णय स्थायीने घेतला आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. मात्र पावसाळ्यात पाणीबाणीचा निर्णय स्थायीने घेतला आहे. शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. खाबूगिरीमुळे विनापरवाना बांधकामे सुरू आहेत. आजमितीला केवळ मोठे बांधकाम व्यावसायिकच महापालिकेकडे अधिकृत बांधकाम परवान्यासाठी येतात. सन २०११ मध्ये ७७२, २०१२ मध्ये ९१३, २०१३ मध्ये ११५७, २०१४ मध्ये १२९४, २०१५ मध्ये ११४०, २०१६ मध्ये १५२३ आणि २०१७ मध्ये १७९० अशा एकूण आठ हजार ८८९ बांधकामांना गेल्या सात वर्षांत परवानग्या दिल्या आहेत.