शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

विद्यार्थी-पालकांच्या अांदाेलनामुळे सीमा भिंतीवरुन शालेय साहित्याचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:36 PM

पिंपरी- चिंचवड शहरात नव्याने होणाऱ्या आयुक्तालयासाठी प्रेमलोकपार्क मधील इमारतीची जागा निश्चित केली आहे.येथील विद्यार्थ्यांना पर्यायी जागेची व्यवस्था दळवीनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत केली आहे.मात्र या जागेला पालकांचा विरोध असल्याने आज पालक व विद्यार्थ्यांनी पावसात भिजत पालिका प्रशासनाचा घोषणाबाजी करत निषेध केला.

चिंचवड: आम्हाला आमचीच शाळा हवी आहे.नवीन इमारत ही आमच्यासाठी सुरक्षित नाही.या भूमिकेवर पालक व विद्यार्थी ठाम राहिल्याने पालकांचा विरोध डावलत आज महापालिका प्रशासनाला शालेय साहित्य सीमा भिंतीवरून स्थलांतरित करावी लागले. प्रेमलोकपार्क मधील महात्मा ज्योतीबा फुले ही इंग्रजी माध्यमाची शाळा नव्या आयुक्तालयासाठी स्थलांतरित करण्यात आली आहे. नवीन इमारतीला पालकांचा विरोध असल्याने आज पालक व विद्यार्थ्यांनी पावसात भिजत पालिका प्रशासनाचा घोषणाबाजी करत निषेध केला.

    शहरात नव्याने होणाऱ्या आयुक्तालयासाठी प्रेमलोकपार्क मधील इमारतीची जागा निश्चित केली आहे.येथील विद्यार्थ्यांना पर्यायी जागेची व्यवस्था दळवीनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत केली आहे.मात्र या जागेला पालकांचा विरोध आहे.नवीन इमारत ही रेल्वे लाईन जवळ असून येथे गुन्हेगारांचा वावर असतो.मुलांसाठी येथे सुरक्षित वातावरण नसल्याचे सांगत पालकांनी आंदोलन उभे केले आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असूनही पालक व विद्यार्थी प्रेमलोकपार्क येथील शाळेसमोर आंदोलन करत होते.शाळेचे साहित्य स्थलांतरीत करण्यासाठी या मुळे अडचणी येत होत्या.पालकांचा विरोध पाहून पालिका प्रशासनाने या इमारतीला सील लावले होते.दळविनगर येथील नवीन इमारतीत शाळा सुरू करण्यात आली आहे.मात्र शालेय साहित्य प्रेमलोक पार्क मधील इमारतीत अडकल्याने आज पोलीस बंदोबस्तात हे साहित्य सीमाभिंतीवरून स्थलांतरित करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली.

आयुक्तालयासाठी चिंचवड मधील महापालिकेच्या शाळेची इमारत निश्चित करण्यात आल्याने येथे कामाला सुरुवात झाली आहे.शाळेला पर्यायी व्यवस्था करत दळविनगर येथील नवीन इमारतीत शाळा स्थलांतर करण्यात आली. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी फक्त बारा विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.या शाळेतील पालक सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत.पालिका प्रशासन,नगरसेवक, राजीकय व सामाजिक कार्यकर्ते,पोलीस प्रशासन यांनी पालकांशी चर्चा केली.मात्र यावर तोडगा निघाला नाही.पालक पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत.-------------------------------------पालकांचा विरोध का ?पालिका प्रशासनाने दळवीनगरातील नवीन इमारतीत सर्व सोयी सुविधा दिल्या आहेत. रेल्वेलाईन परिसरात व शाळेला सीमाभिंत उभारली आहे.अजून काही सुविधा हव्या असतील तर त्याची दखल घेतली जाईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवक,शिक्षणमंडळ अधिकारी,आमदार लक्ष्मण जगताप,पक्षनेते एकनाथ पवार या सर्वांनी पालकांना चर्चेतून मार्ग काढता येईल असे सांगितले आहे. मात्र तरीही पालकांचा विरोध कायम असल्याने आता या बाबत उलट,सुलट चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेSchoolशाळाcommissionerआयुक्त