तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेने यंदा ६९.०२ टक्के करवसुली केली आहे. ३१ मार्चअखेर २४ कोटी १७ लाख रुपये कराची रक्कम जमा झाली. गतवर्षी ही करवसुली सुमारे ८२ टक्के होती. नगर परिषद प्रशासनाने प्रयत्न करूनही विविध कारणांमुळे ही करवसुली घटली आहे.
नगर परिषद सभागृहात नागरिकांना कर भरणा करणे सोयीचे जावे, या दृष्टीने कॅशलेस सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच बिल दुरुस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात आली. कर निरीक्षक विजय शहाणे, सहायक करनिरीक्षक जयंत मदने, लिपिक प्रवीण माने, संभाजी भेगडे ,सुनील कदम, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, तुकाराम मोरमारे, विशाल लोणारी, आदेश गरूड, आणि करसंकलन विभागातील कंत्राटी कर्मचार यांनी करवसुलीसाठीची यंत्रणा सुटीच्या दिवशी राबवली. मोठ्या थकबाकीदारांनी ती जमा न केल्यास संबंधिताची नळ जोडणी खंडित करण्यात येईल़नळजोड धारकांनी थकीत पाणीपट्टी त्वरित जमा करावी, गृहनिर्माण संस्थांनी व नळजोड धारकांनी जलमापक यंत्रे तत्काळ बसून घ्यावीत, असे आवाहन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले आहे. करवसुलीसाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात आली होती.अनेक नळजोड धारकांनी पाणीपट्टी भरली नाही़ त्यामुळे त्यांचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच उर्वरित थकबाकी वसुलीसाठी कठोर उपाययोजना राबविणार असल्याचे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले. पाणीपट्टी करापोटी केवळ ३ कोटी १६ लाख रुपये जमा झाले आहेत.चालू आर्थिक वर्षात चतुर्थ वार्षिक कर आकारणी पुनर्मूल्यांकनाचे काम अधिकृत एजन्सीकडून करून घेण्यात आले. मात्र कराची बिले काही नागरिकांना वेळेत मिळाली नाहीत. बिले वेळेत वाटप न झाल्याने याचा फटका करसंकलनाला बसला असल्याचे वास्तव आहे. करसंकलन विभागातील तोकडा कर्मचारी वर्ग आणिवाढत्या मिळकती यांचा ताळमेळ बसू शकला नाही.४तळेगाव नगर परिषद हद्दीतील ३४ हजार १३८ मालमत्ताधारकांची नगर परिषदेत नोंद झाली आहे.४मात्र करसंकलन विभागात अवघे १० कर्मचारी काम करीत आहेत. शासनाच्या आकृती बंधाप्रमाणे कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात कर्मचारी वर्ग गुंतला असल्याने याचाही करसंकलनावर परिणाम झाला आहे.