पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन स्मार्ट सिटीला जोडणाºया पुणे मेट्रोच्या कामाने गती घेतली आहे. पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर खराळवाडी ते कासारवाडी फाटा या दरम्यानच्या रस्त्यावर खांब उभारण्याचे काम सुरू आहे. कामासाठी दुपारी बारा ते चार या वेळेत शहरात येणारी ग्रेड सेपरेटरमधील लेन बंद केली जात असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.पुणे रेल प्रकल्पांतर्गत पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचे काम सध्या वेगाने सुरू आहे. वल्लभनगरातील कलासागर हॉटेलसमोरील पहिला खांब तयार झाला आहे. पुढे खराळवाडीपर्यंत खांबांचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी वेळोवेळी रस्ता बंद केला जातो किंवा वाहतुकीचे नियोजन बदलले जाते, याची माहिती मेट्रो नागरिकांना देत नसल्याने या रस्त्याने जाणाºया-येणाºयांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. दोन दिवसांपूर्वी दुपारी एकच्या सुमारास एचए कंपनीसमोरील बीआरटीबाहेरील रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते.त्याच वेळी ग्रेड सेपरेटरची लेनही बंद केली होती.मेट्रोेच्या कामामुळे वाहतुकीत बदल१पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका ते रेंजहिल दरम्यान वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले असून, या बदलांमुळे ओढावणाºया परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केली आहे.२ महापालिका ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या मार्गिकेवर सध्या वेगवान काम सुरू असून, आतापर्यंत आवश्यक खांब उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या नाशिक फाटा ते खराळवाडी फूट ओव्हर ब्रिज आणि सीएमई ते नाशिक फाटा या मार्गावर काम सुरू आहे. काम सुरू असताना वाहतुकीत खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.३पुण्याहून मुंबईकडे जाणाºया मुख्य रस्त्याच्या दोन्ही लेन ११ ते सायंकाळी ५ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत बंद राहतील़ या वेळां व्यतिरिक्त एक लेन ही वाहतुकीसाठी खुली असेल. याबरोबर पुण्याकडे येणारी मुख्य रस्त्याची एक लेन ही वाहतुकीसाठी पूर्णत: उपलब्ध असणार आहे. सीएमई ते नाशिक फाटा या रस्त्यावर देखील मुंबई- पुणे मुख्य रस्त्यावरील एक लेन ही वाहतुकीसाठी २४ तास खुली राहील तर एक लेन बंद राहील. याशिवाय सर्व्हिस रस्त्यावरील वाहतूक ही नेहमीप्रमाणेच सुरू राहील, असे महामेट्रोच्या वतीने कळविण्यात आले आहे. हे बदल केल्यानंतर सदर रस्त्यावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम होईल. हे होत असताना नागरिकांनी सहाकार्य करावे, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
मेट्रोच्या कामामुळे खोळंबा, कासारवाडी ते पिंपरी मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 7:05 AM