विशाल शिर्के
लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्यातील ६४ लाख ५२ हजार ग्राहकांनी एप्रिल ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत एकदाही वीज बिल भरले नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. या ग्राहकांकडे तब्बल ११ हजार २७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकीत वीज बिलामुळे महावितरणसमोर आर्थिक विवंचनासमोर उभी राहिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशासह राज्यामध्ये मार्च-२०२०च्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन (टाळेबंदी) जाहीर करण्यात आले. त्यामुळे व्यापार, उद्योग आणि सार्वजनिक जनजीवन ठप्प झाले. त्याचा फटका सर्वसामान्यांसह सर्वांनाच बसला. महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून छापील वीज बिल देणे थांबविले होते. टाळेबंदी शिथील करण्यास सुरुवात झाल्यानंतर जून महिन्यात वीज मीटरवरील नोंदी घेऊन वीज बिल देण्यास सुरुवात केली. मात्र, वीज वीज बिलाची वसुली सुधारलेली नसल्याने महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.महावितरणने दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २०२० पासून कृषी ग्राहक वगळता ६४ लाख ५२ हजार १५० ग्राहकांनी एकदाही वीज बिल भरलेले नाही. त्यांच्याकडील ही थकबाकी तब्बल ११ हजार २६६ कोटी ६० लाख रुपयांवर गेली आहे. वसुली होत नसल्याने महावितरणला दैनंदिन गाडा चालविण्यासाठी आर्थिक संकटचा सामना करावा लागत आहे. दररोजचा खर्च भागविणे देखील दिवसेंदिवस कठीण होत असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येत आहे.
---लॉकडाऊननंतर २४ टक्के ग्राहकांनी एकदाही बिल भरले नाही. राज्यात घरगुती, वाणिज्य, उद्योग, कृषी आणि इतर ग्राहकांची संख्या २ कोटी ७३ लाख ३१ हजार आहे. त्यापैकी ६४ लाख ५२ हजार जणांनी एप्रिल ते ऑक्टोबर-२०२० पर्यंत एकदाही पैसे भरले नाहीत. म्हणजेच एकूण ग्राहकसंख्येपैकी तब्बल २३.६० टक्के ग्राहकांनी सात महिन्यांत महावितरणला एकही छदाम दिलेला नाही.---
एप्रिल-ऑक्टोबर २०२० पर्यंत एकही बिल न भरलेले प्रमुख ग्राहक
ग्राहक संख्या थकबाकी कोटींतघरगुती ५५,९८,८४० ३५२८.८
वाणिज्य ५,९२,६९७ ८३६.७उद्योग ८७,३११ ३७८.२
इतर १,७३,३०२ ६५३३.९